
कोटकामतेची भगवती देवी
मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी स्थापन केलेले भगवती देवीचे सुमारे तीनशे वर्षे जुने मंदिर देवगड तालुक्यातील कोटकामते गावात आहे. गावाभोवती तटबंदी असल्याने कोट कामते असे नामकरण झाले असावे. किल्ल्याचे आता अवशेष मात्र उरले असले तरीही देवीचे मंदिर सुबक आणि मांगल्यपूर्ण भाव जागृत करणारे आहे. मंदिर परिसर किल्ल्यापासून २ फर्लांग अंतरावर आहे असं गॅझेट सांगते. अश्विन महिन्यात इथं होणाऱ्या यात्रेला ३ हजार लोक येतात अशी गॅझेटमधील नोंद आहे. गावातील भातशेती आता किल्ल्याच्या खंदकातही केली जाते. गावात एकच बुरुज पाहता येतो. […]
Categories: ऐतिहासिक, जिल्हा सिंधुदुर्ग, देवीची मंदिरे, प्रवासाच्या चित्रकथा, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, kotkamte, maratha navy, shivaji, sindhudurg