
आंबव चा सूर्यनारायण
कोकणात सूर्योपासना महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कदाचित जास्त होत असावी. कर्णेश्वर देवळातील सूर्य, खारेपाटण ची सूर्यमूर्ती, आरवली चा सूर्य, कशेळी चा आदित्यनारायण अशी अनेक मंदिरे. संगमेश्वर तालुक्यातील एक शांत, निर्मळ सुंदर गाव म्हणजे आंबव. पोंक्षे मंडळी आंबव गावची त्यामुळे गावाला पोंक्षे-आंबव म्हणत असावे. पेशवाईत दांडेकर मंडळी इथं आली आणि त्यांनी अनेकांना पोसले म्हणून त्यांना पोंक्षे म्हंटले जाऊ लागले असं मी श्री आशुतोष बापटांच्या पुस्तकात वाचलं. या गावात आधी आठवडी बाजार भरत असे.. आंग्रेकाळात तो पुढं माखजनला गेला असं वाटतं. इथलं पूर्वाभिमुख […]
Categories: इतर देवालये, जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan temples, shivaji