
नागोबा मंदिर आवास
कोणे एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. सकाळी समुद्रस्नान घ्यायचे, मग आवासच्या वक्रतुंड विनायकाचे दर्शन घेऊन कनकेश्वराच्या दर्शनाला जायचे आणि मग रात्री मुक्कामाला आवास गावात परतायचे अशा नेमाने त्यांनी आयुष्य जगले. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात त्यांची पूजा केली जाऊ लागली. तेच हे नागोबा देवस्थान. या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम मापगांव येथील […]
Categories: इतर देवालये, जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी • Tags: alibag, alibaug, awas, nageshwar temple, nagoba, rewas