
सागर निवासी दत्तगुरु
दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरे च्या दिशेने निघाले की वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे लाडघर. इथले तामसतीर्थ प्रसिद्ध आहे कारण इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे हे होत असावे. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. इथं वेळेश्वर मंदिरही आहे. पण तिथं पुढं न जाता कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने लाडघर गावाचे उत्तर टोक गाठायचे. तिथं रस्त्याला उतार लागण्याआधी उजवीकडे दत्त मंदिर परिसर दिसतो. तिथं दत्त-गुरूंचे दर्शन घ्यायचे. इथल्या दीपमाळेचा आकार खूपच आकर्षक […]
Categories: इतर देवालये, जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: कोकण, कोकण सूर्यास्त, दापोली, लाडघर, लाडघर दत्त, dapoli, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, konkan temples, ladghar, maratha navy, shivaji