
समुद्राकाठचा स्वल्पविराम, दांडेवाडी
आवडतो मज अफाट सागर,अथांग पाणी निळेनिळ्या जांभळ्या जळातकेशर सायंकाळी मिळे कविवर्य कुसुमाग्रज कधीकधी वाचलेली एखादी कविता अनुभवायला मिळते ती अशी. रत्नागिरीहून विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने सागरी महामार्गाने जात असताना दांडेवाडीचे दर्शन होते. वाघोटन खाडीवरील पूल ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या उजवीकडे काळसर वाळूची पुळण आणि समुद्राचा किनाऱ्याकडे डोकावणारा भाग दिसतो. क्षितिजरेषेवर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. दांडेवाडीच्या पुलाला तडे गेले असल्याने इथं मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद आहे. पण गाडी किंवा दुचाकी घेऊन आपण सहज जाऊ शकतो. या बाजूने विजयदुर्ग आणि आंबोळगड या बिंदूमधील अंतर […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, समुद्रकिनारे, bakale, dande, dandewadi, gheriya, jaitapur, kokan, konkan, Konkan beaches, madban, Ratnagiri beaches, vijay, vijaydurga