
पद्मगड, सिंधुदुर्गाचा पहारेकरी
मालवणच्या किनाऱ्यावरून क्षितिजावर पसरलेला बेलाग आणि प्रचंड सिंधुदुर्ग आपलं लक्ष वेधून घेत असतो. सिंधुदुर्ग आणि मालवणची किनारपट्टी यांच्या मधल्या भागात समुद्राचा खडकाळ भाग आपल्याला दिसतो. या खडकांना टाळून वळसा घालून नावाडी बोट सिंधुदुर्गाच्या जेटीवर नेतो. किल्ल्याच्या पूर्वेला जो विस्तृत खडक आहे तिथं आपल्याला तटबंदी आणि दरवाजाही दिसू लागतो. हा आहे सिंधुदुर्गाचा पहारेकरी म्हणून बांधला गेलेला पद्मगड. (जंजिऱ्याजवळ समुद्रात बांधलेला कांसा किल्ला किंवा पद्मदुर्ग हा वेगळा किल्ला आहे त्याच्याशी नामसाधर्म्यातून गल्लत करू नये) किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष आजही पाहता येतात. तिथं मला […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पद्मगड, सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, moracha dhonda, padmagad, shivaji, shivaji maharaj, sindhudurg