
हेदवी ची बामणघळ
हेदवी हे गाव तिथल्या दशभुज गणपती मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पण तिथून साधारणपणे दोन किमी पश्चिमेला असलेला तिथला समुद्रकिनाराही आवर्जून भेट द्यावी असाच आहे. छोटासाच शांत समुद्रकिनारा आणि त्याला लागून असलेले उमामहेश्वराचे देऊळ. पर्यटकांची गर्दी इथं सहसा नसते. ग्रामपंचायतीने बांधलेल्या पार्किंगमध्ये वाहन ठेवून किनारा पाहायला चालत निघायचे. उत्तर दक्षिण दिशेने चंद्रकोरीच्या आकारात पसरलेला हा किनारा जेमतेम अर्ध्या तासात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत पाहता येतो. ओहोटीच्या वेळेला स्वच्छ पुळणीवर चालता येते. भरतीला मात्र किनाऱ्याच्या आतवर लाटा येतात. भरतीच्या वेळेला पूर्ण […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: उमामहेश्वर मंदिर, जिल्हा रत्नागिरी, बामणघळ, हेदवी, bamanghal, hedvi, kanhoji angre, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, maratha navy, ratnagiri