गणेशगुळेचा दामोदर
कोकणातील अनेक विलक्षण सुंदर गावांपैकी एक म्हणजे गणेशगुळे. इथलं गणपती मंदिर तसे प्रसिद्ध आहेच. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला ही म्हणही अनेकांना ठाऊक असते. पण समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या वनराईत दडलेलं लक्ष्मी नारायणाचे देऊळही अगदी खास. समुद्र भ्रमंतीतून वेळ काढून मुद्दाम जावं असं हे ठिकाण. म्हंटलं तर कोकणातील गावांमध्ये दोन अडीचशे वर्षे जुनी शंकर किंवा विष्णूची मंदिरे असतात तसं दिसणारं अगदी टिपिकल देऊळ.. म्हंटलं तर इथल्या शांत रम्य आसमंतात एक वेगळा अध्यात्मिक अनुभव देणारं हे ठिकाण. कोकणात मी अनेक ठिकाणी श्री विष्णूच्या मूर्ती […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: कोंकण, कोकण पर्यटन, कोकण मंदिरे, कोकण वेड, कोकण समुद्र, गणेशगुळे, जिल्हा रत्नागिरी, नारायण, रत्नागिरी, लक्ष्मी नारायण, लक्ष्मीनारायण, ganeshgule, konkan, Konkan beaches, konkan temples, Lakshmi narayan mantra, lakshminarayan, shivaji