
सागरस्वप्न गणेशगुळे
समुद्र म्हणजे जणू निसर्गाचं स्थितप्रज्ञ, प्रशांत रूप. कधी हे रूप रौद्र तांडव अवतारही धारण करतं पण बहुतेक वेळेला ध्यानमग्न आणि स्तब्धच असतं. पण या रूपाचे वर्णन शब्दांच्या आवाक्यातले नाही. कोकणातील शेकडो किलोमीटर लांब किनारपट्टीवर कोसाकोसाला सागर सौंदर्याचे नवीन दर्शन होत राहते. रत्नागिरीजवळ असलेल्या गणेशगुळे किनाऱ्याची सोबत मनातल्या कवीला जागृत करणारी.. स्वच्छ सुंदर रेशमी वाळूवर चालता चालता फेसाळणाऱ्या लाटांना समांतर चालत या चंद्रकोरीच्या आकाराच्या किनाऱ्याला गवसणी घालायचा प्रयत्न करायचा. सड्यावरून उतरून किनाऱ्याला आलेल्या या वाटेवर मिळणारी उसंत अनुभवत मुग्ध व्हायचं. रत्नागिरीहून […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, darya firasti, ganesh, ganesh temple, ganeshgule, ganpatipule, gule, konkan, Konkan beaches, Konkan ganesh, Ratnagiri beaches