
घडीवाडी चा खडकाळ किनारा
देवगड तालुक्याचे उत्तर टोक म्हणजे विजयदुर्ग किल्ला. टोम्बोलो किंवा भूशीर नामक भौगोलिक रचनेवर हा किल्ला बांधला गेला आहे. या किल्ल्याला स्वतःचा समुद्रकिनारा आहे. तिथून दक्षिणेकडे आले म्हणजे दामलेमळा, कोठारवाडी, कालवशी वगैरे किनारे आहेतच. हे किनारे शोधता शोधता मी अरबी समुद्राला भिडलेल्या एका खडकाळ टापूवर पोहोचलो. गिर्ये च्या रामेश्वराच्या मागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला या ठिकाणी घेऊन जातो. या ठिकाणी मी मागे एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ च्या आसपासही आलो होतो परंतु अंधार पडायला लागला होता त्यामुळे किनाऱ्यापर्यंत जाऊन भटकता आले […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, समुद्रकिनारे • Tags: ghadiwadi, girye, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, shivaji, sindhudurga, vijayadurga