
किल्ले सर्जेकोट: सिंधुदुर्गाचा सोबती
मालवणला सिंधुदुर्ग पाहून झाला की मग शहराच्या उत्तरेला असलेल्या कोळंबच्या किनाऱ्याची पुळण पाहायला जायचं. तिथूनच पुढं एखादा किलोमीटर उत्तरेला गेल्यावर सर्जेकोट बंदर लागते. तिथेच हा सिंधुदुर्गाचा सोबती असलेला उपदुर्ग सर्जेकोट आहे. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ असलेल्या उपदुर्गाचं नावही सर्जेकोट आहे त्याच्याशी कधीकधी गल्लत केली जाते. हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्यातून थेट दिसत नाही पण जिथं गड नदी समुद्राला जाऊन मिळते तिथं टेहेळणी करण्यासाठी नदीच्या मुखावरच किल्ल्याची बांधणी केली गेली आहे. आता किल्ल्यात वस्ती असून फारसं बांधकाम शिल्लक नाही. किल्ल्याचा दरवाजा मात्र तग […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: chhatrapati shivaji maharaj, incredible india, kanhoji angre, konkan, Konkan beaches, konkan forts, Maharashtra tourism, marathi blogs, sindhudurg, sindhudurga tourism