आंग्रे घराण्याची स्मारके
अलिबागमधील शाळेजवळ छत्री बाग नामक एक आंग्रेकालीन बाग प्रसिद्ध आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील सदस्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या छत्र्या आहेत. आता इथं बरीच पडझड झालेली असली तरीही या दगडी छत्र्यांवरील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. इथल्या एक एकर परिसरात जवळजवळ २० वृंदावने आहेत परंतु त्यापैकी नक्के कोणते कोणाचे हे मात्र माहिती अभावी लक्षात येत नाही. मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी इथेच आहे. दरवर्षी ४ जुलैला त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. मुंबईतील नौदलाच्या नाविक तळाला आणि खांदेरी किल्ल्यावरील दीपगृहाला सरखेल कान्होजी आंग्रे […]
Categories: जिल्हा रायगड, मराठी • Tags: alibag, alibaug, alibaug cenotaphs, angre, cenotaph, chhatri, chhatri baug, kanhoji angre memorial