आंजर्ल्याची दुर्गादेवी
कोकणातील दीड-दोन किमीचा सुंदर किनारा लाभलेलं आणि पर्यटनासाठी लोकप्रिय असं एक गाव म्हणजे आंजर्ले. या गावातून फेरफटका मारत असताना जुन्या काळातील वास्तुरचनेचा वारसा जपणारी कित्येक घरे आपण पाहू शकतो. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. सरदार शिर्के आणि खामकरांनी आंजर्ले गाव वसवले असे मी काही पुस्तकांत वाचले होते. आंजर्ले गावाचा दक्षिण किनारा जोग नदीच्या मुखाशी आहे. तिथेच असलेल्या टेकडीवरील कड्यावरचा गणपती अतिशय प्रसिद्ध आहे. जोग नदीपलीकडे पाजपंढरी आणि हर्णे गावे येतात तर उत्तर दिशेने गेले तर पाडले आणि […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, शिल्पकला • Tags: durga, Durga maa pictures, durgadevi, durgadevi temple, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, navaratri devi images, shivaji