Darya Firasti

नवागावची ज्यू दफनभूमी

दफनभूमीतील स्मृती स्तंभ

भारतातील ज्यू धर्मियांपैकी बेने इस्राएल समाज हा सर्वात जुन्या समाजांपैकी एक मानला जातो. उत्तर कोकणात मुख्यत्वेकरून या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. मुंबई, ठाणे, पेण, पनवेल, किहीम – नवागाव, रेवदंडा, बोर्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रार्थनास्थळे आणि दफनभूमी आहेत. मराठीशी एकरूप झालेल्या या समाजातील लोकांना इस्राएलची निर्मिती झाली तेव्हा आपला देश मिळाला आणि बहुतेक मराठी ज्यू तिथं जाऊन स्थायिक झाले. परंतु आजही दख्खनेतील आपल्या इतिहासाबद्दल त्यांना आपुलकी आहे.

बेने इस्राएल समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे सुमारे २२०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन मध्ये सेल्युसिड घराण्याचे अत्याचार सहन न झाल्याने जहाजात बसून काही कुटुंबे भारतात आली. किनाऱ्याजवळ झालेल्या वादळ आणि अपघातात त्यापैकी अनेक जण मारले गेले आणि ७ परिवार कोकण किनाऱ्यावर उतरले. आणि स्थानिक संस्कृतीशी समरस होऊन जगू लागले. बेने इस्राएल समाजाचे लोक तब्बल २२०० वर्षांपूर्वी भारतात आले याचा लेखी पुरावा सापडलेला नाही. पण हा दावा खोटा ठरवणारा पुरावाही नाही. मिसार-बिन-मुहलहिल या १० व्या शतकात आलेल्या अरब व्यापाऱ्याच्या नोंदीप्रमाणे कोकणात तेव्हाही ज्यू धर्मीय लोक होते याची पुष्टी मिळते. या समाजात आजही एकमेकांना मलिदा नावाचे भात आणि फळांनी केलेले पक्वान्न देण्याची प्रथा पाळली जाते. बेने इस्राएल समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे सुमारे २२०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन मध्ये सेल्युसिड घराण्याचे अत्याचार सहन न झाल्याने जहाजात बसून काही कुटुंबे भारतात आली. किनाऱ्याजवळ झालेल्या वादळ आणि अपघातात त्यापैकी अनेक जण मारले गेले आणि ७ परिवार कोकण किनाऱ्यावर उतरले. आणि स्थानिक संस्कृतीशी समरस होऊन जगू लागले. बेने इस्राएल समाजाचे लोक तब्बल २२०० वर्षांपूर्वी भारतात आले याचा लेखी पुरावा सापडलेला नाही. पण हा दावा खोटा ठरवणारा पुरावाही नाही. मिसार-बिन-मुहलहिल या १० व्या शतकात आलेल्या अरब व्यापाऱ्याच्या नोंदीप्रमाणे कोकणात तेव्हाही ज्यू धर्मीय लोक होते याची पुष्टी मिळते.

इसवीसन १००० च्या सुमारास इजिप्तहून आलेल्या ज्यू डेव्हिड रहाबी ने इथल्या लोकांचं येहुदी असणं ओळखलं. परंतु त्यांच्यापैकी कोणी धर्मगुरू नसल्याने त्याने शापूरकर, राजपूरकर आणि झिराडकर अशा कुटुंबांतील सदस्यांना ही जबाबदारी सोपवली. कैरो येथील सिनेगॉग मध्ये अबू झिरी कोहेन नामक ठाण्यातील ज्यू व्यापाऱ्याबद्दल उल्लेख सापडतात, ही नोंद १२ व्या शतकात ज्यू लोकांचे कोकणात असणे सिद्ध करते. मुंबई व पुण्यात बगदादी ज्यू समाज होता ते स्वतःला बेने इस्राएल लोकांपेक्षा श्रेष्ठ समजत असत. इस्राएल मध्ये परतलेल्या बेने इस्राएल बांधवांनाही समतेसाठी संघर्ष करावा लागला पण पुढे १९६४ च्या सुमारास त्यांना पूर्ण ज्यू म्हणून मान्यता मिळाली. मलिक अंबरकडून अष्टमकर कुटुंबाला मिळालेल्या सनदीतूनही या समाजाची ऐतिहासिक नोंद मिळते. तेली समाजाप्रमाणे हे लोक तेलाचे घाणे चालवत आणि शनिवारच्या दिवशी काम बंद ठेवत त्यामुळे त्यांना शनिवार तेली असेही नाव पडले. नवागावच्या दफनभूमीतील स्मारक हे डेव्हिडच्या ताऱ्याच्या आकाराचे आहे आणि इथल्या बहुसंख्य कबरी १९ व्या आणि २० व्या शतकातील आहेत. या ठिकाणाला भारत आणि इस्राएल ला जोडणारा एक दुवा मानलं जातं.

4 comments

  1. Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
    भारताने जगाला नेहमीच आकर्षित केले आहे. वेगवेगळ्या कारणांंनी जगाभरातून अगदी प्राचीन काळापासून लोक भारतात येत असत. कोकणात आलेले ज्यू हे याचे एक ठळक उदाहरण.

  2. Mrunmai Pokharankar's avatar Mrunmai Pokharankar

    ते नवगांव आहे. अलिबाग शहरामधे ईस्राइल आळी आहे, तीथे या समाजाची वस्ती होती. काही आवासकर नावाची कुटुंबे अजुनही आहेत. बरीचशी मंडळी आजच्या घडिला ईस्राइलला परत गेली व तेथिल सरकारच्या मदतिने स्थायिक झाली.

Leave a reply to aroundindiaghansham Cancel reply