
रत्नागिरीचा पांढरा समुद्र
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावरून दोन्ही बाजूला दोन किनाऱ्यांचे दर्शन घडते. एका बाजूला काळा समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला पांढरा समुद्र. या किनाऱ्यांना हा रंग तिथल्या वाळूमुळे मिळालेला आहे. आणि वाळूचा रंग त्यात असलेल्या विविध खनिजांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. रत्नागिरीच्या उत्तर टोकाला असलेला पांढरा समुद्र म्हणजे स्वच्छ नितळ पाणी, मखमली पांढरी वाळू आणि अथांग निळे आकाश यांचा मनसोक्त अनुभव घेण्याची जागा. इथं उभं राहून एका बाजूला नारळाच्या बागा दिसतात तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी बंदरातील रहदारी आणि रत्नदुर्गाचा डोंगर दिसतो. चंद्रकोरीप्रमाणे आकार […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: कोकण, जिल्हा रत्नागिरी, पांढरा समुद्र, रत्नागिरी, konkan, Konkan beaches, Konkan best beaches, Ratnagiri beaches, white, white sand, white sea