कासवांचे गाव वेळास
सकाळी सहाची वेळ. होळीचे मार्चमधील दिवस म्हणजे हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. पण कोकण किनाऱ्यावरील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला वेळास गाव आहे. सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोट किल्ल्याजवळ हे गाव आहे. दोन रस्ते आणि दुतर्फा घरे एवढाच या आटोपशीर गावाचा पसारा. गावातील घरे ओलांडून मी बांधावर आलो. रस्ता पुढे टेकडीवरून भारजा नदीच्या मुखाशी जातो त्याला डावीकडे सोडून छोट्या पुलाजवळ खाली उतरून बांधावरून चालत समुद्र किनाऱ्याकडे जायचं. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: anjarle turtle, bankot, bhau katdare, kokan, konkan, mohan upadhye, olive ridely, sahyadri nisarga mitra, turtle, turtle conservation, turtle festival, velas