
फिरस्ती पूर्णगडाची
रत्नागिरी शहरातून दक्षिणेला सागरी महामार्गाने निघायचे. हा प्रवासच मोठा रम्य आहे. पावस, कशेळी, आंबोळगड अशी कितीतरी सुंदर ठिकाणं या मार्गावर पाहता येतात. मराठ्यांच्या इतिहासात कोकण किनारपट्टीचे स्थान फार महत्त्वाचे. सर्व खाड्यांच्या मुखाशी दुर्ग बांधून जलवाहतूक आणि व्यापारावर पहारा ठेवणे हे महत्त्वाचे. मुचकुंदी नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं उत्तरेकडील टोकाला एका ५० मीटर उंच टेकडीवर एक छोटेखानी पण रेखीव दुर्ग आहे. तो म्हणजे किल्ले पूर्णगड. या मुचकुंदी नदीतून साटवली पर्यंत बोटी वाहतूक करत असत. डॉम जोआओ कॅस्ट्रोने या नदीला बीटल […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, darya firasti, gaonkhadi, kanhoji, konkan, maratha, maratha forts, maratha navy, muchkundi, purnagad, shivaji, siddheshwar