आंजर्ले (ताडाचा कोंड) दीपगृह
कोकण किनाऱ्यावरील नवीन दीपगृहांपैकी एक म्हणजे ताडाचा कोंड दीपगृह. कोणी याला आंजर्ले दीपगृह म्हणते तर कोणी केळशी लाईट हाऊस. हे ठिकाण आंजर्ले गावाच्या तसे जवळच. केळशीहून आंजर्ल्याला समुद्र किनाऱ्यामार्गे जात असताना आडे, पडले हे किनारे ओलांडल्यानंतर एका शंभर मीटर उंच टेकडीवर हे दीपगृह आहे. तिथं समोरच लाल मातीने भरलेल्या सड्यावर गाडी पार्क करून सागर निळाईच्या शेकडो छटा पाहत उभे राहायचे.. आपलं स्वागत करायला बहुतेक वेळेला थंडगार झुळूक तिथं असतेच.. कोकण म्हंटलं की शुभ्र वाळूच्या स्वच्छ किनाऱ्यावर निळ्याशार समुद्रात डुंबणे हे […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, दीपगृहे, मराठी • Tags: anjarle, Anjarle lighthouse, जिल्हा रत्नागिरी, kanhoji angre, kokan, konkan, lighthouse, maratha navy, ratnagiri, Ratnagiri beach, shivaji