
उंच डोंगरावरील कनकेश्वर
अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास १५ किमी अंतरावर एक डोंगर आहे. या पहाडाची उंची जवळजवळ ३८५ मीटर असून माथ्यावर एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ते म्हणजे श्री कनकेश्वर देवस्थान. मापगांव नावाच्या गावातून सुमारे ७५० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहता येते. थोडीशी विश्रांती घेत धडधाकट माणूस हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करू शकतो. जांभा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही. तीव्र चढ पार केल्यानंतर देवाचे पाऊल व गायीचे शिल्प असलेल्या गायमांडीचा टप्पा […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: alibaug, अलिबाग मंदिर, आंग्रे, कनकासूर, कनकेश्वर मंदिर, झिराड, बारव स्थापत्य, माधवराव पेशवे, रघुजी आंग्रे, barav, mapgaon, raigad district, shiva temple, step well