बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
गेल्या पावसाळ्यात आचरे किनाऱ्यावर मनसोक्त पायपीट केली होती. या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला आचरा नदीच्या मुखाशी उभे राहून नदीचा प्रवाह आणि भरतीच्या लाटांची झुंबड पाहता पाहता समोरच्या किनाऱ्यावरील टेकाडावर असलेल्या दीपगृहाने लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या दिवशी वाडेकर काकांबरोबर कांदळवन सफारी केल्यानंतर टेकडी चढून दीपगृहाचे दर्शन घेतले होते.. पण तिथूनच पुढं उत्तरेला मुणगे गावाच्या दिशेने दोन अडीच किलोमीटरच्या टप्प्यात दोन अस्पर्श किनारे पाहायचे राहून गेले होते. ते म्हणजे धाकटा आणि थोरला केउंडला.. जानेवारी २०२५च्या कोकण वारीत इथं जायचं ठरलं आणि मग […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: achara mangrove, kokan, konkan, Konkan beaches, kundapur mangrove, maratha navy, shivaji, tarkarli, tarkarli beach