
गर्द वनराईतील केशवराज
काही अनुभव इतके अभूतपूर्व असतात की त्यातून आयुष्यभर पुरेल अशा आठवणींचे संचित निर्माण होत असते. दापोलीजवळ आसूद इथं डोंगरावर असलेल्या केशवराज मंदिराला मी प्रथम गेलो १५-१६ वर्षांचा असताना. नारळ सुपारीच्या बागांतून सूर्यकिरणांचे कवडसे अंगावर घेत डोंगर उतरून जाणे आणि मग साकव पूल ओलांडून पुन्हा टेकडी चढणे. त्या नीरव निसर्गविश्वात खळाळणारे पाणी असो किंवा पक्ष्यांची किलबिल असो. एक एक आवाज स्पष्ट आणि मनाला भिडणारा. अचानक समोर पायवाटेवर कसलीतरी सळसळ जाणवावी आणि चपळाईने पळत गेलेलं मुंगूस दिसावं सभोवताली पाहावं तर हिरव्या रंगाच्या […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: asud, dapoli, keshav, keshavraj, konkan, konkan temples, Konkan tourism, vartak