भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी शहरातील या छोट्याशा घरातला. त्यांचे वडील गंगाधरराव इथं भाडेकरू म्हणून राहत होते. टिळकांचा जन्म इथं 23 जुलै 1856 रोजी झाला. टिळकांच्या निधनानंतर रत्नागिरीतील लोकांनी हे घर त्यांचे स्मारक व्हावे म्हणून विकत घेतले.

पुढे टिळकांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला हे स्मारक सरकारने तीस हजार रुपये खर्च करून विकत घेतलं आणि आता ते महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालये विभागाकडे आहे. टिळकांच्या आयुष्यातील विविध स्मृती इथं जपल्या गेल्या आहेत.

टिळकांचे मूळ गाव चिखलगाव आहे दापोली आणि दाभोळच्या मध्ये आहे. तिथली काही दृश्ये आपण या व्हिडिओत पाहू शकता.
आमचा दर्या फिरस्ती ब्लॉग कोकणातील अशा अनेक विलक्षण ठिकाणांची चित्र भ्रमंती आहे. सर्व कोकणवेड्या, निसर्गवेड्या रसिकांना इथं येणं आवडेल अशी आशा आहे.