
अलिबाग शहरातील श्री व्यंकटेश बालाजीचे अतिशय सुंदर मंदिर गोपाळशेठ दलाल यांनी इसवीसन १७८८ मध्ये बांधले असा उल्लेख कुलाबा जिल्हा गॅझेटच्या १८८३ च्या आवृत्तीमध्ये आहे. हे मंदिर मराठा वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण आहे.

इथल्या दगडी स्तंभांवर अतिशय सुंदर कोरीवकाम पाहता येते. मंदिराच्या गाभाऱ्याला उंच शिखर आहे आणि सभामंडपावरील भागात एक घुमट दिसतो. दुर्दैवाने अतिशय भडक असा राखाडी रंग मंदिराला लावला गेल्याने त्याच्या मूल रंगाची कल्पना येत नाही.
मंदिर जरी साधे असले तरी त्याची प्रमाणबद्ध रचना आणि भव्यता आकर्षित करणारी आहे. कोकणात अनेक पेशवेकालीन मंदिरे आहेत आणि त्यांची स्वतःची अशी एक स्थापत्यशैली आहे. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून अशाच वास्तूंची चित्रभ्रमंती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
माझ्या माहितीत हे मंदिर दगडी आहे. इथू ५० mtrवर एक असेच कोरिवकाम केलेले शिवमंदिर आहे. बालाजी मंदिर काही वर्षांपूर्वी दुरावस्थेत होते आता socalled सुधारले आहे असं म्हणायचं.दिवा लागतो, पुजा होते.