Darya Firasti

लक्ष्मीकेशव देवस्थान धामणी

मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच अनेक परिचित अपिरिचित ठिकाणे आहेत जी थोड्यावेळ विश्रांती म्हणून प्रवासाला विराम देऊन पाहता येतील. आरवलीहून संगमेश्वरकडे जात असताना उजव्या बाजूला धामणी नावाचे गाव लागते. तिथं लक्ष्मीकेशवाचे छोटेसे देऊळ आहे. कोकणातील विष्णुशिल्पांच्या खजिन्यातील एक रत्न या फारशा परिचित नसलेल्या गावात आहे. धामणी गावातील वाकणकर कुटुंबियांच्या खासगी जागेत आहे प्रशस्त प्राकार असलेले मंदिर आहे.

आयुधक्रम पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्याने ही केशवमूर्ती ठरते (खालचा उजवा हात, मग वरचा उजवा हात, मग वरचा डावा हात आणि शेवटी खालचा डावा हात या घडयाळाच्या विरुद्ध असलेल्या चक्राकार क्रमाने आयुध क्रम ठरवलं जातो.) मूर्तीवरील कोरीवकाम विशेषतः आभूषणे अतिशय सुंदर आहेत. शिल्प जवळपास ४ फूट उंच आहे आणि मुख्य मूर्तीच्या पायाशी लक्ष्मी आणि गरुड मूर्ती पाहू शकतो. डोक्यावरील मुकुटाला किरीटमुकुट असं म्हंटलं जातं. इतर केशवमूर्तींप्रमाणे इथेही प्रभावळीवर दशावतार कोरलेले दिसतात.

मी इथं गोळवली नावाच्या गावात राई नावाच्या अतिशय सुंदर ऍग्रो होम स्टे मध्ये राहिलो होतो. श्री अमोल लोध (+91 98221 18855) यांनी इथं ही सुंदर बाग आणि त्यातील शेतघराची रचना केली आहे. अगदी निवांत असलेला निवारा आणि चविष्ट सकस जेवण अशी इथली मौज असते. इथंही राहण्याचा अनुभव नक्की घ्या हे मी कोकणप्रेमींना सुचवू इच्छितो. 

One comment

Leave a reply to आशिष लिमये Cancel reply