
नाटेश्वर शिवालय
आंबोळगडच्या सुंदर समुद्रकिनाऱ्याजवळच यशवंतगड किल्ल्यापाशी आहे नाटे नावाचं एक टुमदार छोटंसं गाव. या गावाचं वैभव म्हणजे इथं असलेलं नाटेश्वर शिवमंदिर. मुख्य रस्त्यापासून थोडं आत जाऊन स्वयंभू जागृत देवस्थान नाटेश्वर मंदिर आपल्याला सापडतं. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दारातच असलेल्या दीपमाळांची दिमाखदार रचना. विशेष म्हणजे हे मंदिर जरी भगवान शंकराचे असले तरीही इथं राम-लक्ष्मण-सीता यांच्या सुबक मूर्तीही पाहता येतात. आणि त्यांच्या चरणी लीन झालेले श्री हनुमान सुद्धा. राजापूर तालुक्यात धोपेश्वर (म्हणजेच धूतपापेश्वर) सारखी अनेक सुंदर मंदिरे आहेत. कोकणी घरे, वाड्या, नारळ-सुपारीच्या बागा […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: ambolgad, जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, Konkan shiva, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, nareshwar temple, nate, shivaji, shivaji maharaj