
खोकरी घुमट
कोकणात आणि भारताच्या आरमारी इतिहासात लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्याने आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सिद्दी घराण्याचा दबदबा मोठा होता. अबिसीनिया म्हणजेच इथियोपियातून आलेल्या आणि सुरुवातीला गुलामी करून यथावकाश आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उत्कर्ष साधलेल्या सिद्दींनी उत्तर कोकणावर वर्चस्व प्रस्थापित केले. अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी होता. मुरुडजवळ खोकरी आणि खारशेत नावाच्या गावांच्याजवळ आपण काही घुमट असलेले मकबरे पाहू शकतो. सिद्दी सत्ताधीशांची ही थडगी आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेली ही थडगी आहेत, त्यापैकी सगळ्यात मोठे थडगे सिद्दी […]
Categories: जिल्हा रायगड, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: habshi, habsi, janjira, khokari ghumat, khokri, khokri tombs, kokan, konkan, murud, siddi, siddi khairiyat, siddi surul, siddi yakut khan