
सिद्दीची लंका: जंजिरा
मुरुड-जंजिऱ्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर निवांत सुट्टी घेऊन आराम करायचा. शहराच्या धकाधकीपासून दूर शांत, धीम्या आयुष्याची मजा घ्यायची.. आणि मग कंटाळा आला तर एखाद्या सकाळी जवळच राजपुरीला जाऊन जंजिरा किल्ला पाहायचा बेत आखायचा. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करूनही न जिंकलेला हा जलदुर्ग. महाराजांच्या कट्टर शत्रूचे बलस्थान. अबिसीनिया म्हणजेच आजच्या इथियोपियातून आलेल्या सिद्दी लोकांच्या कडवेपणाची आणि शौर्याची कथा समजून घ्यायला इथं गेलं पाहिजे. जंजिरा हे महाराजांचं अधुरं स्वप्नच.. त्यामुळे किल्ला पाहताना आम्हा शिवभक्तांना या गोष्टीची हुरहूर वाटणे साहजिकच आहे. […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: darya firasti, janjira, kokan, konkan, murud, padmadurga, sambhaji, shivaji, shivaji maharaj, siddi surul, siddi yakut