
कर्णेश्वरचा कलाविष्कार
कोकणात प्राचीन म्हणता येतील अशी खूप मंदिरे नाहीत. संगमेश्वराच्या परिसरात सोमेश्वर, काशी-विश्वेश्वर आणि कर्णेश्वर ही मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर दगडात केलेल्या कोरीवकामाचा उत्कृष्ट वारसा जपून आहे. संगमेश्वरला अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्या जिथं एकत्र येतात तिथं जवळच हे स्थान आहे. जवळपास एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर कर्णराजाने बांधले असे सांगितले जाते. हा चालुक्य वंशातील राजा असून या भागात त्याचे शासन असल्याची नोंद ऐतिहासिक साधनांत आहे. दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, karneshwar, kasba, konkan, Konkan shiva, konkan temples, sangameshwar