Darya Firasti

शेडवईचा श्री केशरनाथ

दापोली ते मंडणगड रस्त्यावर दहागाव रस्त्याने शेडवईकडे जाणारा रस्ता येतो. उतार चढाव आणि वळणे असलेल्या या रस्त्याने आपण एका फाट्यापाशी पोहोचतो जिथं आपल्याला उजवीकडे २०० मीटरवर उताराच्या कच्च्या रस्त्याने जाता येईल असे दर्शवणारी श्री केशरनाथ मंदिराची पाटी दिसते. या उतारावरून एका पाराजवळ आपण पोहोचतो तिथं खळाळणारा ओढा आणि त्याच्या बाजूला असलेले लहानसे कौलारू मंदिर आपल्याला दिसते.

Shri Kesharnath & Ganesha

मंदिरातील मूर्ती श्री केशरनाथाची म्हणजे विष्णूची असून पद्म, शंख, चक्र, गदा म्हणजेच पशंचग हा क्रम पाहता केशवाचे हे रूप असल्याचे लक्षात येते. मूर्तीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी तर उजव्या बाजूला गरुडाचे शिल्प आहे. पाषाणात कोरलेल्या या मूर्तीत मस्तकाजवळ डावीकडे महेश तर उजवीकडे ब्रम्ह आहे असे लक्षात येते. प्रभावळीवर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे दशावतार कोरलेले दिसतात.

केशवाचे वस्त्र आणि अलंकार अतिशय नाजूक कोरीवकामाने घडवलेले दिसतात. या पाषाणाला असलेल्या काळ्या-हिरव्या चमकदार पृष्ठभागामुळे ही मूर्ती अजूनच खुलून दिसते.

इथं बाजूलाच महादेवाचे स्थानही आहे, जमिनीत थोडंसं खोदून बसवलेलं शिवलिंग इथं दिसतं. जवळ पायऱ्या चढून एक छोटा दगडी कोनाडा दिसतो हे एखाद्या ग्रामदेवतेचं स्थान असावं असं वाटतं. या परिसरात स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय आहे आशाताई कामत आणि सुनीला सेनगुप्ता या बहिणींनी इथं हे मोठं काम सुरु केलं आहे. अशा प्रयत्नांना हातभार लावणे हे आपले सामाजिक कर्तव्य ठरते. पर्यटन करत असताना ते सहजसाध्य होणे अजूनच विशेष. http://sjvidyalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल आणि संस्थेला योगदानही देता येईल.

कोकणातील अद्भुत ठिकाणांची चित्रभ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती संकेतस्थळाला भेट देत रहा. कोकणवेड्या मित्रांना, आप्तेष्टांनाही या ब्लॉगबद्दल नक्की सांगा.

One comment

  1. Pingback: बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव | Darya Firasti

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: