
समाधी मायनाक भंडारींची
छत्रपती शिवरायांच्या आरमाराच्या प्रमुखांपैकी एक नाव म्हणजे मायाजी भाटकर म्हणजेच मायनाक भंडारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेने अनेक सोन्यासारखी माणसे जोडली गेली. त्यांच्या कर्तृत्वाला मराठेशाहीत वाव मिळाला. नाविक युद्ध परंपरेला पुन्हा संजीवनी देणाऱ्या शिवरायांना कोकणातून अशी झुंजार माणसे शोधावी लागली. या मायनाक भंडारींची समाधी त्यांचे गाव भाट्ये येथे आहे. रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला काजळी नदी ओलांडताच हे छोटेसे गाव लागते. नारळ संशोधन केंद्राची बाग आपण समुद्राला लागून जाणाऱ्या रस्त्याने पाहू शकतो. काजळी पूल उतरताच डावीकडे खाडीलगत काही अंतर जाऊन मग उजवीकडे गावाला […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: bhandari, bhandari militia, bhate, bhatye, daryasarang, harji bhatkar, konkan, Konkan heritage, maratha fort, maratha forts, maratha history, maratha navy, maynak bhandari