
भाट्ये समुद्रकिनारा
रत्नागिरी शहरातून सागरी महामार्गाने दक्षिणेला निघालं की काजळी नदीवर बांधलेला पूल येतो. हा पूल पार करताच एक सुंदर समुद्र किनारा आपल्याला पाहता येतो. हा आहे भाट्येचा सागरतीर. पुलावरून पाहताना नदीचे मुख आणि अथांग पसरलेला दर्या आणि मग पलीकडे आकाश निळाई असा निळ्या रंगाचा बहुरूपी अविष्कार पाहायला मिळतो. भाट्ये किनाऱ्यावरील वाळू काळसर रंगाची आहे. भाट्ये किनाऱ्यावरून उत्तरेकडे पाहिले की रत्नागिरी शहर आणि त्यातून सागराकडे झेपावलेली डोंगररांग दिसते. काळा समुद्र या नावाने ओळखला जाणारा सागरतीरही दिसतो. डोंगराच्या पश्चिम टोकाला रत्नदुर्ग किल्ल्याची तटबंदी […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, bhatye, bhatye beach, kajali river, konkan, Konkan beaches, Ratnagiri beaches, Ratnagiri fort