
पांडवा देवीचे मंदिर
भारताच्या विविध भागांमध्ये महाभारत आणि पांडवांशी निगडित अनेक आख्यायिका आहेत. अनेक ठिकाणी स्थानिकांनी महाभारतातील पात्रांना तिथल्या दंतकथांमध्ये सामावून घेतलेले दिसते. आवासचा समुद्र किनारा पाहून आपण थोडे दक्षिणेकडे समुद्राला समांतर रस्त्याने गेलो तर आपल्याला एक छोटेसे साधेसेच मंदिर दिसते. हे आहे पांडवा देवीचे मंदिर. कोळी समाजामध्ये हे देवीला फार महत्व आहे. मंदिरामध्ये असलेल्या देवीच्या मूर्तीबरोबरच तिथं असलेल्या दगडी होडीचीही पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे की या दगडी होडीत बसून पाच पांडव आवासजवळ आले आणि एका रात्रीत विविध मंदिरे निर्माण करून […]
Categories: जिल्हा रायगड, देवीची मंदिरे, मंदिरे • Tags: alibaug, जिल्हा रायगड, bheem, bhim, fishermen community, koli, mahabharat, pandwa devi, stone boat