
रत्नागिरी शहरातून सागरी महामार्गाने दक्षिणेला निघालं की काजळी नदीवर बांधलेला पूल येतो. हा पूल पार करताच एक सुंदर समुद्र किनारा आपल्याला पाहता येतो. हा आहे भाट्येचा सागरतीर. पुलावरून पाहताना नदीचे मुख आणि अथांग पसरलेला दर्या आणि मग पलीकडे आकाश निळाई असा निळ्या रंगाचा बहुरूपी अविष्कार पाहायला मिळतो. भाट्ये किनाऱ्यावरील वाळू काळसर रंगाची आहे.

भाट्ये किनाऱ्यावरून उत्तरेकडे पाहिले की रत्नागिरी शहर आणि त्यातून सागराकडे झेपावलेली डोंगररांग दिसते. काळा समुद्र या नावाने ओळखला जाणारा सागरतीरही दिसतो. डोंगराच्या पश्चिम टोकाला रत्नदुर्ग किल्ल्याची तटबंदी आहे तिथं दीपगृह दिसू शकते. भाट्ये गावात नारळ संशोधन केंद्राची बाग आहे आणि किनाऱ्याला लागूनच झरी विनायक मंदिरही आहे. तिथून पुढे कुर्ली चा डोंगर आहे. गावात मराठा आरमाराचे दर्यासारंग मायनाक भंडारी यांची समाधी आहे. त्याबद्दलचा ब्लॉग इथं वाचू शकता.
दर्या फिरस्तीच्या माध्यमातून आम्ही कोकण किनाऱ्यावरील अशा अनेक ठिकाणांची चित्रकथा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. हा ब्लॉग नक्की वाचा. आणि तुमच्या मित्रांना जरूर याबद्दल सांगा. शेयर करा लाईक करा.