
सागर सखा किल्ले निवती
निवती आणि भोगवे या दोन अप्रतिम समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला किल्ले निवती म्हणजे दर्याचा दोस्तच. ब्लू फ्लॅग चं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला शुभ्र वाळूचा किनारा पाहायला सर्वात योग्य जागा म्हणजे किल्ले निवतीचा उत्तरेकडे असलेला बुरुज. गोड मालवणी बोली, तितकेच गोड शहाळ्याचे पाणी, खारा पण थंड सागर वारा, नितळ निळाईचे विविध अविष्कार दाखवणारा समुद्र, नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी स्वच्छ सफेद वाळू बरोबर केलेली रंगसंगत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी दृष्टीने आणि दृढनिश्चयाने रचलेला इतिहास या सगळ्यांच्या मिश्रणातून घडलं आहे […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा सिंधुदुर्ग, darya, darya firasti, firasti, fort nivati, fort nivti, konkan, nivati, nivti, sawantwadi, shivaji, shivrai, vengurla