
भ्रमंती विजयदुर्गाची
मराठ्यांच्या स्वराज्याचे चिलखत म्हणजे दुर्ग … मग ते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर तैनात डोंगरी किल्ले असोत किंवा अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग … आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व फार मोठे. वाघोटण नदीच्या मुखाशी गिर्ये गावाजवळ हा किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे… शिलाहार राजांच्या काळात १२ व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात… डोम जो कॅस्ट्रो आणि तावर्निए सारख्या प्रवाशांनी आदिलशाहीचा भक्कम किल्ला म्हणून याला वाखाणले. टॉलेमी आणि पेरिप्लस ने विजयदुर्गाचा उल्लेख बायझंटियम असा केला आहे विजयदुर्गाची चित्रकथा व्हिडीओ रूपात पाहायची असेल तर या लिंकला जरूर भेट द्या. तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला. छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्ग … आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला … मारुतीच्या मंदिराकडून किल्ल्यात प्रवेश करायचा … जीबीच्या दरवाजातून या दुर्गशिल्पात दाखल व्हायचे. तटबंदीवर युद्धात झेललेल्या जखमांचे व्रण आजही दिसतात … मूळ किल्ला ५ एकरांचा होता … शिवरायांनी त्याचा विस्तार १७ एकर क्षेत्रफळात केला गोमुख दरवाजा पटकन दृष्टीस पडत नाही, आणि संरक्षक […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, bakale, Gibraltar, gibraltar of the east, girye, helium, kanhoji, maratha, maratha navy, norman, vijayadurga, vijaydurg