
अंजनवेलचा गोपाळगड
वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. प्राचीन काळी नदीच्या पात्रांचा उपयोग व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. वसिष्ठी नदीतून पूर्वेला चिपळूण पर्यंत जहाजे जाऊ शकत असत. या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपाळगडाचा उपयोग होत असे. इतिहास – आज दिसणारा गोपाळगड हे सतराव्या शतकातील विजापुरी म्हणजे […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: anjanvel, dabhol, gopalgad, guhagar, jaladurga, kanhoji angre, khairyatkhan, konkan, maratha navy, sea forts, siddi sat, vashishthi river, vashishti river