
हरवलेला फत्तेदुर्ग
सुवर्णदुर्ग किल्ल्याचे तीन उपदुर्ग हर्णे बंदराच्या जवळपास बांधले गेले. कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा दुर्ग. यापैकी फत्तेदुर्गाची जागा जरी आपल्याला माहिती असली तरीही त्याठिकाणी किल्ल्याच्या बांधकामाचे किंवा तटबंदीचे कोणतेही अवशेष आता सापडत नाहीत. कोळी बांधवांच्या वस्तीने हा भाग व्यापून टाकला आहे. सकाळच्या वेळेला हर्णे बंदरावर गेलं की कनकदुर्ग अवशेषांच्या पायऱ्यांवरून फत्तेदुर्गाचे ठिकाण दिसते. कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग यांना जोडणारा दगडी पूल पूर्वी होता आता तिथं मोटर रस्ता आहे. समुद्राच्या बाजूला जुन्या भिंतींचे अवशेष दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात हा भाग सिद्दीच्या ताब्यात […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी • Tags: angre, dabhol, dapoli, fattedurg, harnai, kanakadurga, kanhoji, khairyatkhan, kokan, konkan, shivaji, shivaji maharaj, siddi, tulaji