
रत्नागिरी शहरापासून अगदी जवळच काजळी नदीच्या पलीकडे सोमेश्वर नावाचे एक गाव आहे. तिथेच असलेलं सोमेश्वराचे पुरातन मंदिर हे शिवभक्तांसाठी एक खास जागा आहे. पूर्वी इथं येणे कठीण होते परंतु कळली नदीवर पूल झाल्यानंतर रत्नागिरी शहरातून वीस मिनिटांत सोमेश्वर गावात पोहोचता येते. काजळी नदीचे महत्त्व व्यापारी वाहतुकीसाठी विशेष महत्त्वाचे होते. आजही या भागात समुद्राच्या वाळूतून बांधकामाचा चुना बनवण्याच्या भट्ट्या आहेत असं मी ऐकलं. गावात पोहोचल्यानंतर अतिशय सुबक बांधणीचे आणि लाकडी कोरीवकाम असलेले हे शिव मंदिर आपल्याला खुणावते.

कौलारू छपरातून येणारा प्रकाशाचा कवडसा तिथं अद्भुत वातावरण निर्माण करत होता. दुपार असली तरीही उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. लाकडी फ्रेमवर छप्पर तोललेलं होतं.

मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले आहे. म्हणजे साधारणपणे मंदिरे पूर्वाभिमुख असतात परंतु पश्चिमाभिमुख आहे. मंदिराभोवताली दगडी तटबंदी आहे. शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या चतुर्थ मंडल पद्धतीने या मंदिराची बांधणी केली गेली आहे.

मंदिरात विठ्ठलादेवी आणि श्री रवळनाथाची मूर्ती आहे.. श्री सोमेश्वर केळकर, सोहोनी, सोवनी, सोनी, आठवले, फडके, कोझरकर अशा कुटुंबांचे कुलदैवत मानले जाते.

मंदिरात अतिशय सुंदर दगडी दीपमाळा आहेत. या रचनेच्या दीपमाळा हे कोकणचे वैशिष्ट्य आहे. मंदिरात काही प्राचीन पाषाण मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यावर संशोधन झाले तर कालनिश्चिती होऊ शकेल.

कोकणातील मंदिरे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत कारण जरी ती उत्तर मध्ययुगीन असली तरीही त्यांची स्वतःची एक वास्तुरचना शैली आहे. या शैलीचं एक वेगळं सौंदर्य आहे. त्याबद्दल अभ्यास आणि त्याच्या संवर्धनाचे मार्ग शोधले जाणे गरजेचे आहे. दर्या फिरस्ती प्रकल्पात कोकणातील अशाच विलक्षण ठिकाणांची चित्रभ्रमंती आणि डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा, तुमच्या मित्रांना, कोकणवेड्या दोस्तांना जरूर सांगा. फेसबुक, व्हाट्सअप सारख्या माध्यमातून हा ब्लॉग जगभर पोहोचवायला आम्हाला मदत करा ही अगत्याची विनंती.
खुप छान माहिती!
superb lanja talukyatil satavali gavatil puratan vitthal mandir ani shivkalin gadhi che chitran kara
Pingback: रेडी चा गणपती | Darya Firasti
Pingback: वंखनाथ महादेव मंदिर | Darya Firasti
Mast. Khup chan👍👍.