
अलिबागच्या दक्षिणेला असलेले नागाव एकेकाळी समुद्रकिनारी असलेले एक शांत टुमदार सुंदर खेडे होते. आता इथं वीकेंडला धमाल करायला येणाऱ्या मुंबईकरांची गर्दी असते. मात्र जातिवंत भटक्यांनी थोडा शोध घेतला तर इथं अशी अनेक पुरातन स्थळे आहेत जिथं पर्यटक क्वचितच येतात.

तळ्याकाठी असलेले पेशवेकालीन म्हणजे भगवान शंकराचे नागेश्वर मंदिर. राघोजी आंग्रेंचे सुपुत्र मानाजी आंग्रेनी १७७२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं आंगरेकालीन अष्टागर या ग्रंथात शां वि आवळस्कर सांगतात.
या दगडी मंदिरात एक छोटा नंदी आहे जो एका बाजूला ठेवलेला दिसतो. शिवाय गणेश आणि भैरवाची मूर्तीही मंदिरात आहे. मंदिराच्या बाहेर एक मोठा नंदी आहे. मंदिराच्या बाहेर असलेली दीपमाळ सहस्रबुद्धे नामक गृहस्थाने बांधली अशी नोंद सापडते.

कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.
संदर्भ –
1) कुलाबा जिल्हा गॅझेट
2) आंगरेकालीन अष्टागर – शां वि आवळस्कर