
शेडवईचा श्री केशरनाथ
दापोली ते मंडणगड रस्त्यावर दहागाव रस्त्याने शेडवईकडे जाणारा रस्ता येतो. उतार चढाव आणि वळणे असलेल्या या रस्त्याने आपण एका फाट्यापाशी पोहोचतो जिथं आपल्याला उजवीकडे २०० मीटरवर उताराच्या कच्च्या रस्त्याने जाता येईल असे दर्शवणारी श्री केशरनाथ मंदिराची पाटी दिसते. या उतारावरून एका पाराजवळ आपण पोहोचतो तिथं खळाळणारा ओढा आणि त्याच्या बाजूला असलेले लहानसे कौलारू मंदिर आपल्याला दिसते. मंदिरातील मूर्ती श्री केशरनाथाची म्हणजे विष्णूची असून पद्म, शंख, चक्र, गदा म्हणजेच पशंचग हा क्रम पाहता केशवाचे हे रूप असल्याचे लक्षात येते. मूर्तीच्या डाव्या […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: bankot, chakra, dapoli, kesharnath, keshav, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, mandangad, sadwe, shankha, shedwai, shilahar, vishnu