
समरभूमी कुलाबा
अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची जानेवारीतील एक सकाळ. एरवी पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलेल्या या चौपाटीवर नीरव शांतता अनुभवणे म्हणजे विलक्षणच. निरभ्र आणि थंड सकाळी क्षितिजावर दिसणारा कुलाबा किल्ला. ओहोटीनंतर किनाऱ्यावर उरलेली पाण्याची नक्षी. नांगरून ठेवलेल्या होड्या आणि वाऱ्याने फडफडणारे त्या होड्यांवरचे झेंडे. किनाऱ्यावर सुरु झालेली सकाळची लगबग. सागरगडाच्या दिशेने दिसणारे ढगांचे पुंजके आणि धुक्याची चादर. दूर कुठेतरी मंदिरात लागलेल्या भजनाची कानावर पडणारी अस्पष्ट चाहूल. रात्रभर मासेमारी करून परतणाऱ्या होडीच्या डिझेल इंजिनचा ताल आणि थंड वाळूतून चालताना नितळ पाण्याचा पायाला होणार स्पर्श. या किल्ल्यावर मी […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: alibag, alibaug, angre, ganesh, kanhoji, kanhoji angre, khanderi, kolaba, kulaba, kulaba canons, kulaba drone, kulaba fort, sarjekot, underi, yashwant darwaja