
हेदवीचा दशभुज गणेश
कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, bamanghal, chiplun, dabhol, dapoli, ganapati, ganesh, ganpati, guhagar, hedavi, hedvi, jogalekar ganesh, konkan, konkan temples