
श्री अंजनेश्वर मीठगव्हाणे
या ब्लॉगपोस्टच्या प्रायोजक कांचन कोडिमेला जी आहेत. त्यांच्यासारख्या समर्थकांच्या मदतीनेच दर्याफिरस्ती कव्हरेज शक्य झाले. माडबन या नितांतसुंदर समुद्रकिनाऱ्याजवळच असलेलं मीठगव्हाणे हे गाव. पर्यटकांची गर्दी इथं सहसा होत नाही. या गावात श्री अंजनेश्वर शिव मंदिर आहे. कोकणी पद्धतीच्या स्थापत्याचा उत्तम नमुना असलेलं हे सुंदर देवालय सुमारे तीनशे वर्षे जुने मानले जाते. मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदी असून दरवाजावर कौलारू नगारखाना बांधलेला आहे. त्यातून मंदिरात प्रवेश करायचा. आणि कोकणी पद्धतीच्या दीपमाळांचा दिमाख पाहायचा. मी जेव्हा इथं गेलो होतो तेव्हा मागे निळ्याशार स्वच्छ […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, jaitapur, konkan, Konkan beaches, Konkan shiva, konkan temples, Konkan tourism, Konkan wooden temples, madban, mithgavhane, npcil, rajapur, shiva temples in konkan, wooden carvings