• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

पोखरबाव शिव गणेश

September 14, 2024 by chinmayebhave

देवगड तालुक्यात काही खूप विलक्षण मंदिरे आहेत, त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि तरीही शांत, रम्य असा परिसर असलेलं देऊळ म्हणजे पोखरबाव चा सिद्धिविनायक. विस्तीर्ण कातळ सड्यावर वाहणाऱ्या एका खळाळत्या ओढ्याला लागून असलेलं एक देवस्थान. आचऱ्याहून देवगड कडे जाताना एका अरुंद पुलाजवळ डाव्या बाजूला या देवळाची पाटी दिसते. सड्यावर सावलीत गाडी लावायची, अन मंदिरात जाऊन आधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे. तिथं बाजूलाच उंदीर मामा सुद्धा आहे, त्याला आपले काही गाऱ्हाणे असेल तर सांगायचे. गुरवाने लावलेल्या उदबत्ती चा मंद दरवळ वाऱ्याची झुळूक आली […]

Categories: गणपती मंदिरे, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, शिवालये • Tags: devgad, kokan, konkan, pokharbav, shivaji, siddhivinayak, sindhudurg, sindhudurga

Leave a comment

तोंडवळी चा वाघेश्वर

September 14, 2024 by chinmayebhave

मालवण पासून फार दूर नाही तरीही खूप शांत, निवांत, निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं एक ठिकाण म्हणजे तोंडवळी. या जागेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं असलेली वनराई. सहसा समुद्रकिनाऱ्याच्या इतक्याजवळ इतकी दाट वनराई पाहायला मिळत नाही. इथे फक्त वनराई आहे असंच नाही तर इथं खूप जंगली प्राण्यांचा वावरही आहे. अर्थात तिथं नेहमी राहणाऱ्यांनी अनेकदा मार्जार श्रेणीतील पट्टेरी वाघ आणि बिबट्या अशा दोन्ही शिकारी प्राण्यांचं दर्शन घेतले आहे. कोण्या पर्यटकाला हा योग लाभला असेल असं मला तरी माहिती नाही. पूर्वेला म्हणजेच डाव्या […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, शिवालये • Tags: incredible india, konkan, Konkan beaches, malvan, maratha navy, shivaji, sindhudurg, talashil, tondavali, vengurla, wagheshwar

Leave a comment

सीतापूरची अविस्मरणीय सकाळ

October 28, 2023 by chinmayebhave

पहाटे सव्वाचार च्या सुमारास माझ्या रूमची बेल वाजली. सूर्योदय होण्याच्या आत मला सीतापूर किनारा गाठायचा होता त्यामुळे ठरल्याप्रमाणे रिक्षावाला आलेला होता. खरंतर मला नील आयलंड वर (आताचे नाव शहीद द्वीप) सीतापूर किनाऱ्याजवळच हॉटेल हवं होतं, पण ते उपलब्ध नसल्याने मी लक्ष्मणपूर किनारा क्रमांक २ जवळ exotica square नावाच्या ठिकाणी राहिलो होतो. सूर्योदयाची वेळ त्या दिवशी सकाळी पाच दहाची होती. होय अंदमानला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही मुंबईच्या तुलनेत लवकर, म्हणजे सुमारे दीड तास आधी होतात. खंडप्राय देशात एकच टाइम झोन असल्याचे […]

Categories: ग्लोबल दर्या फिरस्ती, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: andaman, havelock, incredible india, konkan, Konkan beaches, neil island, sitapur, sitapur sunrise

Leave a comment

अंदमान: स्वातंत्र्यदेवीचे तीर्थक्षेत्र

October 24, 2023 by chinmayebhave

स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, सचिंद्रनाथ सन्याल, भाई परमानंद, बटुकेश्वर दत्त, मोहन मोईत्रा, पंडित राम राखा, बाबा भान सिंह, इंदुभूषण रॉय, हरिपद चौधरी, महावीर सिंह अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भोगलेल्या यातना आणि बलिदानांच्या पवित्र स्मृती जपलेलं राष्ट्रीय स्मारक आणि स्वातंत्र्य देवीचे तीर्थक्षेत्र म्हणजे अंदमानचे सेल्युलर जेल कारागृह. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाने हादरून गेलेल्या ब्रिटिशांना क्रांतिकारी बंदीवानांना मुख्य भूमीपासून दूर कुठेतरी भयानक ठिकाणी डांबून ठेवण्याची गरज भासू लागली आणि यातूनच अंदमानच्या कैदी वसाहतीचा संकल्प केला गेला. आर्चिबाल्ड ब्लेयर नामक अधिकाऱ्याने इथं चांगले कारागृह […]

Categories: ग्लोबल दर्या फिरस्ती, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: andaman, Andaman jail, barin ghosh, cellular jail, kaalapaani, konkan, sachindranath sanyal, savarkar

Leave a comment

गोष्ट अंदमान निकोबारची

October 23, 2023 by chinmayebhave

ओळख आणि इतिहास अंदमान म्हंटलं की दोन गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात.. समुद्राच्या सान्निध्यात अनुभवायला मिळणारं अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी मंडळींनी जिथं अनन्वित नरकयातना भोगल्या ते सेल्युलर जेल कारागृह. अंदमान आणि निकोबार हे दोन मोठे द्वीपसमूह आहेत. जिथं सुमारे ५७० बेटं आहेत आणि त्यापैकी ३७ बेटांवर लोकवस्ती आहे. पश्चिमेला बंगालचा उपसागर, पूर्वेला थायलंड आणि म्यानमारचा किनारा आणि दक्षिणेला इंडोनेशियातील सुमात्रा बेटाचे उत्तर टोक असा हा बेटांचा विस्तार आहे. इंदिरा पॉईंट हा भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला बिंदू बांदा आचे […]

Categories: ग्लोबल दर्या फिरस्ती, प्रवासाच्या चित्रकथा • Tags: andaman, andaman and nicobar, cottonwood, darya firasti, didu, great nicobar, havelock, Konkan beaches, manakkavaram, neil, nicobar, sea mohwa

Leave a comment

वारसा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा

September 13, 2023 by chinmayebhave

दक्षिण मुंबईतील एक आलिशान इमारत.. ब्रिटिशकालीन वास्तू.. मुंबईच्या वैभवाची साक्ष देणारा तिथला माहौल.. भारतातील मोठ्या शहरांमध्ये आणि थेट युरोपात आढळणारी मध्ययुगीन गॉथिक वास्तुरचना शैली आणि तिला लाभलेलं भारतीय रुपडं. सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या इमारतीत गेल्यावर होणारी भूतकाळात प्रवास केल्याची अनुभूती आणि तिथून बाहेर आजच्या जगाकडे पाहताना जाणवणारी कालविपर्यस्तता (anachronism) फ्रेडरिक विल्यम स्टीफन्स ने डिझाईन केलेल्या आणि सीताराम खंडेरावांनी बांधकाम केलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीत आल्यानंतर मन अन मेंदू १९व्या शतकाच्या शेवटी जाऊन पोहोचले होते. विश्व वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी […]

Categories: जिल्हा मुंबई, पुरातत्व वारसा, प्रवासाच्या चित्रकथा, शिल्पकला • Tags: bartle, bmc, csmt, cstm, frere, konkan, mcgm, mumbai, mumbai gothic, mumbai municipal head office, Sitaram khanderao, stevens, victorian gothic

1

आंबव चा सूर्यनारायण

April 2, 2023 by chinmayebhave

कोकणात सूर्योपासना महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कदाचित जास्त होत असावी. कर्णेश्वर देवळातील सूर्य, खारेपाटण ची सूर्यमूर्ती, आरवली चा सूर्य, कशेळी चा आदित्यनारायण अशी अनेक मंदिरे. संगमेश्वर तालुक्यातील एक शांत, निर्मळ सुंदर गाव म्हणजे आंबव. पोंक्षे मंडळी आंबव गावची त्यामुळे गावाला पोंक्षे-आंबव म्हणत असावे. पेशवाईत दांडेकर मंडळी इथं आली आणि त्यांनी अनेकांना पोसले म्हणून त्यांना पोंक्षे म्हंटले जाऊ लागले असं मी श्री आशुतोष बापटांच्या पुस्तकात वाचलं. या गावात आधी आठवडी बाजार भरत असे.. आंग्रेकाळात तो पुढं माखजनला गेला असं वाटतं. इथलं पूर्वाभिमुख […]

Categories: इतर देवालये, जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan temples, shivaji

Leave a comment

राममंदिर केळशीचे

April 1, 2023 by chinmayebhave

रायगड रत्नागिरी सीमेवर असलेली सावित्री नदी ओलांडून आपण बाणकोट वेळास येथे रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात दाखल होतो. वेळास ओलांडून साखरी ची टेकडी उतरलो की भारजा नदीचे मुख दिसायला लागते. आणि माडाच्या बागांमध्ये लपलेलं एक प्रसन्न आणि टुमदार गाव नदीच्या पलीकडून आपल्याला खुणावत असते… हे गाव म्हणजे केळशी..  कदाचित ओहोटीच्या वेळेला पायी पलीकडे जाताही येत असेल किंवा स्थानिक मंडळी तरीतून जात असतील.. आपल्याला मात्र भारजा नदीच्या पात्राला लागून आधी पूर्वेकडे आणि मग मांदिवली ला भारजा नदीचा पूल ओलांडून असं एकंदर 17-18 किमी […]

Categories: इतर देवालये, जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, kanhoji angre, kelshi, kokan, konkan, Konkan ram, ram mandir, ram temple

Leave a comment

शीर चे लक्ष्मीकेशव

March 28, 2023 by chinmayebhave

कोकणात भटकायला जाऊया असं कोणी म्हंटलं तर डोळ्यासमोर येते सागरनिळाई, स्वच्छ सफेद वाळू, माडांच्या सुपारीच्या बागा.. शांत समृद्ध गावे आणि कौलारू घरे… पण कोकणातील अनुभव आणि कोकणाशी निगडित प्रतिमा इथवर मर्यादित नाहीत. सह्याद्रीच्या पायथ्यापासून सिंधुसागरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात कोकणच्या कोषागारातील अनेक रत्ने आहेत.. मग नद्या असोत.. किंवा देवराया.. रानातील दुर्ग असोत किंवा मग शेती-भाती बागायतीत लपलेली मंदिरे.. हे सगळंच पाहण्यासारखं आहे. कोकण ही भगवान परशुरामाने वसवलेली अपरान्त भूमी.. इथली मंडळी साधी, सरळ, काटक, मेहनती आणि कलासक्त सुद्धा.. अशावेळी अद्वितीय शिल्पकलेचे नमुने […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: अबलोली, कवी माधव, काटदरे, केशव, कोतळूक, गोपाळ कृष्ण गोखले, लक्ष्मी, लक्ष्मीकेशव, शीर, शृंगारतळी, हिरवे तळकोकण, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, shivaji

Leave a comment

बुरंबाडचा श्री आम्णायेश्वर

March 28, 2023 by chinmayebhave

देवळात दर्शन घेताना शांतता, दिव्यत्व, मांगल्य हे सगळं अनुभवता येणं या बाबतीत कोकणातील बहुतेक सगळीच मंदिरे जागृत आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. नवसाला पावतात म्हणून जागृत आहेत असं नाही.. निसर्गाच्या समीप एक समृद्ध आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी देतात म्हणून जागृत असं मी म्हणेन.. आणि अशी अनेक नितांतसुंदर देवालये नेहमीच्या पर्यटनस्थळांपासून दूर थोडी आडबाजूला आहेत. मुद्दाम वाट वाकडी करून तिथं गेल्याशिवाय कोकण पर्यटनाचा अनुभव पूर्णत्व प्राप्त करत नाही असं निदान मला तरी वाटतं. अशीच अनुभूती देणारं एक ठिकाण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील […]

Categories: ग्रामकथा, जिल्हा रत्नागिरी, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, शिल्पकला, शिवालये • Tags: aamneshwar, आमणायेश्वर, बुरंबाड, burambad, konkan, konkan temples, ratnagiri, rhus, rhus mysorensis, sangameshwar

1

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील ५१ शिवमंदिरे
  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • कऱ्हाटेश्वर माहात्म्य
  • पोखरबाव शिव गणेश
  • डच वखार वेंगुर्ला
  • उफराटा गणपती
  • दक्षिणकाशी हरिहरेश्वर
  • सागर सखा किल्ले निवती
  • देवगड दीपगृह
  • कोकणातील अद्भुत कातळशिल्पे

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...