
ग्रामकथा: गोष्ट बुधल सड्याची
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील स्वप्नवत भासणारे हे गाव.. बुधल .. कोणे एके काळी बुद्धीलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव.. समुद्रालगतच असलेल्या डोंगरावर स्थानापन्न झालेल्या दुर्गादेवीच्या आशीर्वादाने सुजल सुफल झालेलं हे गाव.. पर्यटनासाठी अगदी आदर्श .. पण अजून तरी पर्यटनाच्या नकाशावर तितकंसं प्रसिद्ध न झालेलं हे गाव.. समुद्राला उधाण आलं की खळाळणाऱ्या लाटा गर्जना करत किनाऱ्याकडे येतात आणि सड्याला आलिंगन देतात. इथं सगळ्यात प्रथम मी २०१३ साली गेलो.. त्यानंतर दोनतीनदा इथं जाणं झालं.. पण आज ८ वर्षांनी इथं खूप काही बदललं आहे असं नाही.. गावाकडं येणारा रस्ता बहुतेक पूर्वी अगदीच कच्चा होता.. आता तिथं डांबरी सडक आहे आणि मोबाईलचं नेटवर्क व्यवस्थित यायला लागलं आहे हाच काय तो बदल.. पण गावकरी तसेच साधे आणि आपुलकीने चौकशी करणारे.. किनारा अजूनही स्वच्छ आणि अस्पर्श.. कोळी बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींची रांगही अगदी तशीच आणि त्यांच्या मागे उभे असलेलं बाओबाब चं लठ्ठ झाडं सुद्धा तसंच..
Categories: ग्रामकथा, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, budhal, budhal beach, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples