अलिबागचा सर्जेकोट
अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा हा उपदुर्ग. मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा. दगडांच्या चिऱ्यांच्या राशी रचून पाच बुरुजांचे हे बांधकाम केले गेले आहे. आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला आहे. जेणेकरून या जागेचा वापर करून किल्ल्यावर हल्ला करता येऊ नये. दगडांच्या पुलाने किंवा आजच्या भाषेत कॉजवे बांधून सर्जेकोट आणि कुलाब्याला जोडले गेले आहे. हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झाले आहे असे इतिहासकार मानतात. हा किल्ला छोटासाच आहे. सुमारे २७ मीटर x २७ मीटर च्या चौरस भागात हे बांधकाम […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड • Tags: alibag, alibaug, kanhoji angre, kulaba, sambhaji, sarjekot, shivaji