पोखरबाव शिव गणेश
देवगड तालुक्यात काही खूप विलक्षण मंदिरे आहेत, त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि तरीही शांत, रम्य असा परिसर असलेलं देऊळ म्हणजे पोखरबाव चा सिद्धिविनायक. विस्तीर्ण कातळ सड्यावर वाहणाऱ्या एका खळाळत्या ओढ्याला लागून असलेलं एक देवस्थान. आचऱ्याहून देवगड कडे जाताना एका अरुंद पुलाजवळ डाव्या बाजूला या देवळाची पाटी दिसते. सड्यावर सावलीत गाडी लावायची, अन मंदिरात जाऊन आधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे. तिथं बाजूलाच उंदीर मामा सुद्धा आहे, त्याला आपले काही गाऱ्हाणे असेल तर सांगायचे. गुरवाने लावलेल्या उदबत्ती चा मंद दरवळ वाऱ्याची झुळूक आली […]
Categories: गणपती मंदिरे, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, शिवालये • Tags: devgad, kokan, konkan, pokharbav, shivaji, siddhivinayak, sindhudurg, sindhudurga