• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

भाट्ये समुद्रकिनारा

July 14, 2020 by chinmayebhave

रत्नागिरी शहरातून सागरी महामार्गाने दक्षिणेला निघालं की काजळी नदीवर बांधलेला पूल येतो. हा पूल पार करताच एक सुंदर समुद्र किनारा आपल्याला पाहता येतो. हा आहे भाट्येचा सागरतीर. पुलावरून पाहताना नदीचे मुख आणि अथांग पसरलेला दर्या आणि मग पलीकडे आकाश निळाई असा निळ्या रंगाचा बहुरूपी अविष्कार पाहायला मिळतो. भाट्ये किनाऱ्यावरील वाळू काळसर रंगाची आहे. भाट्ये किनाऱ्यावरून उत्तरेकडे पाहिले की रत्नागिरी शहर आणि त्यातून सागराकडे झेपावलेली डोंगररांग दिसते. काळा समुद्र या नावाने ओळखला जाणारा सागरतीरही दिसतो. डोंगराच्या पश्चिम टोकाला रत्नदुर्ग किल्ल्याची तटबंदी […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, bhatye, bhatye beach, kajali river, konkan, Konkan beaches, Ratnagiri beaches, Ratnagiri fort

Leave a comment

समाधी मायनाक भंडारींची

July 14, 2020 by chinmayebhave

छत्रपती शिवरायांच्या आरमाराच्या प्रमुखांपैकी एक नाव म्हणजे मायाजी भाटकर म्हणजेच मायनाक भंडारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेने अनेक सोन्यासारखी माणसे जोडली गेली. त्यांच्या कर्तृत्वाला मराठेशाहीत वाव मिळाला. नाविक युद्ध परंपरेला पुन्हा संजीवनी देणाऱ्या शिवरायांना कोकणातून अशी झुंजार माणसे शोधावी लागली. या मायनाक भंडारींची समाधी त्यांचे गाव भाट्ये येथे आहे. रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला काजळी नदी ओलांडताच हे छोटेसे गाव लागते. नारळ संशोधन केंद्राची बाग आपण समुद्राला लागून जाणाऱ्या रस्त्याने पाहू शकतो. काजळी पूल उतरताच डावीकडे खाडीलगत काही अंतर जाऊन मग उजवीकडे गावाला […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: bhandari, bhandari militia, bhate, bhatye, daryasarang, harji bhatkar, konkan, Konkan heritage, maratha fort, maratha forts, maratha history, maratha navy, maynak bhandari

1

आंग्रेकालीन गोदी

July 11, 2020 by chinmayebhave

आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्‍वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे – या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा  संकल्प मांडला. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला. खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी जलदुर्गांची मालिका उभारून शिवरायांनी आरमाराची ताकद वाढवली. नदीच्या मुखावर जयगड, गोपाळगड, पूर्णगड, यशवंतगड असे किल्ले बांधले गेले आणि खाडीतून होणाऱ्या व्यापारी किंवा सामरिक हालचालींवर वचक बसला. छोट्या गलबतांच्या चपळाईने युरोपियन सागरी सत्तांना […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: angre, chhatrapati shivaji, girye, godi, kanhoji, Maharashtra tourism, malvan forts, maratha navy, mtdc, naval dockyard, NIO, shivaji, sindhudurg, sindhudurga tourism, tulaji, vijaydurg, vijaydurga

Leave a comment

कर्णेश्वरचा कलाविष्कार

July 11, 2020 by chinmayebhave

कोकणात प्राचीन म्हणता येतील अशी खूप मंदिरे नाहीत. संगमेश्वराच्या परिसरात सोमेश्वर, काशी-विश्वेश्वर आणि कर्णेश्वर ही मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर दगडात केलेल्या कोरीवकामाचा उत्कृष्ट वारसा जपून आहे. संगमेश्वरला अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्या जिथं एकत्र येतात तिथं जवळच हे स्थान आहे. जवळपास एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर कर्णराजाने बांधले असे सांगितले जाते. हा चालुक्य वंशातील राजा असून या भागात त्याचे शासन असल्याची नोंद ऐतिहासिक साधनांत आहे. दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, karneshwar, kasba, konkan, Konkan shiva, konkan temples, sangameshwar

1

कोकणातील अद्भुत कातळशिल्पे

July 10, 2020 by chinmayebhave

कशेळीच्या डोंगरसड्यावरचा हा अजस्त्र हत्ती… आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे … विविध प्राणी … काही जलचरही .. काय सांगत असतील ही चित्रे? कोकणात दर्या फिरस्ती प्रकल्पासाठी हिंडत असताना कोकणातील कातळशिल्पांबद्दल मला समजलं आणि त्याबद्दल उत्सुकता होतीच. मध्यंतरी बीबीसी मराठी आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्स ने ही या विषयाची दखल घेतली आहे. या जमिनीला कॅनव्हास करून खोदलेल्या कातळशिल्पांचा आकार इतका मोठा आहे की फोटो काढायला काही ठिकाणी ड्रोन असेल तरच त्यातील रेषा आणि चिन्हे एका दृष्टीक्षेपात नीट दिसतील. दर्या फिरस्ती म्हणजे कोकणच्या […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी, शिल्पकला • Tags: कशेळी, कातळशिल्पे, जिल्हा रत्नागिरी, धनंजय_मराठे, सुधीर_रिसबूड, kasheli, katalshilpe, kokan, konkan, petroglyphs

Leave a comment

सावंतवाडीचा राजवाडा

July 4, 2020 by chinmayebhave

मालवणी भाषेचा गोडवा, कोकणी पाहुणचार, शाकाहारी-मांसाहारी मेजवानीचा बेत, मस्त थंडगार हवामान आणि काहीही न करता निवांत पडून राहण्याची पुरेपूर संधी हे सगळं अनुभवायचं असेल तर सावंतवाडीत यायला हवं. कोकण रेल्वेवरील हे ठिकाण. तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी अशा जलद ट्रेन्स मुळे मुंबईहून वीकएंड प्लॅन करावा इतपत जवळ आलेलं. खेम-सावंत घराण्याची राजधानी असलेलं हे एक छोटंसं शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुकुटातील शिरपेच आहे असं म्हणता येईल. या सावंत भोसले घराण्यातील कर्तबगार राजांनी इथं अनेक शतके राज्य केलं. आजही या राजघराण्यातील वंशज ज्या राजवाड्यात […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, पुरातत्व वारसा, मराठी, संग्रहालये • Tags: fond sawant, ganjifa, khem sawant, kokan, konkan, Konkan beaches, Konkan railway, phond sawant, sawant, sawantwadi, Sawantwadi palace

Leave a comment

समुद्राकाठचा स्वल्पविराम, दांडेवाडी

July 3, 2020 by chinmayebhave

आवडतो मज अफाट सागर,अथांग पाणी निळेनिळ्या जांभळ्या जळातकेशर सायंकाळी मिळे कविवर्य कुसुमाग्रज कधीकधी वाचलेली एखादी कविता अनुभवायला मिळते ती अशी. रत्नागिरीहून विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशेने सागरी महामार्गाने जात असताना दांडेवाडीचे दर्शन होते. वाघोटन खाडीवरील पूल ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या उजवीकडे काळसर वाळूची पुळण आणि समुद्राचा किनाऱ्याकडे डोकावणारा भाग दिसतो. क्षितिजरेषेवर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. दांडेवाडीच्या पुलाला तडे गेले असल्याने इथं मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद आहे. पण गाडी किंवा दुचाकी घेऊन आपण सहज जाऊ शकतो. या बाजूने विजयदुर्ग आणि आंबोळगड या बिंदूमधील अंतर […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, समुद्रकिनारे, bakale, dande, dandewadi, gheriya, jaitapur, kokan, konkan, Konkan beaches, madban, Ratnagiri beaches, vijay, vijaydurga

Leave a comment

सागरस्वप्न गणेशगुळे

July 1, 2020 by chinmayebhave

समुद्र म्हणजे जणू निसर्गाचं स्थितप्रज्ञ, प्रशांत रूप. कधी हे रूप रौद्र तांडव अवतारही धारण करतं पण बहुतेक वेळेला ध्यानमग्न आणि स्तब्धच असतं. पण या रूपाचे वर्णन शब्दांच्या आवाक्यातले नाही. कोकणातील शेकडो किलोमीटर लांब किनारपट्टीवर कोसाकोसाला सागर सौंदर्याचे नवीन दर्शन होत राहते. रत्नागिरीजवळ असलेल्या गणेशगुळे किनाऱ्याची सोबत मनातल्या कवीला जागृत करणारी.. स्वच्छ सुंदर रेशमी वाळूवर चालता चालता फेसाळणाऱ्या लाटांना समांतर चालत या चंद्रकोरीच्या आकाराच्या किनाऱ्याला गवसणी घालायचा प्रयत्न करायचा. सड्यावरून उतरून किनाऱ्याला आलेल्या या वाटेवर मिळणारी उसंत अनुभवत मुग्ध व्हायचं. रत्नागिरीहून […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, darya firasti, ganesh, ganesh temple, ganeshgule, ganpatipule, gule, konkan, Konkan beaches, Konkan ganesh, Ratnagiri beaches

Leave a comment

पावसात गवसलेला रायगड

July 1, 2020 by chinmayebhave

मी इकडेतिकडे हिंडतो, फोटो व्हिडीओ वगैरे टाकतो. पण काही अनुभव खचितच फोटोग्राफच्या पलीकडचे असतात. कदाचित शब्दांच्याही पलीकडचे असतात. काल रायगडावर घेतलेला असाच एक अनुभव… ही माझी किल्ले रायगडावर दहावी खेप. एक फेज अशी होती जेव्हा वर्षाला एकतरी चक्कर रायगडावर होत असे. परत आलं की एकदम रिचार्ज झाल्यासारखं वाटत असे. काल जवळजवळ नऊ वर्षांनी रायगडावर आलो. पावसाळ्यात ही माझी पहिली खेप. धुक्याने भरून गेलेल्या आसमंतात, शांततेत किल्ला पाहताना खूप असामान्य वाटत होतं. त्या शांततेत बुलबुल, रातकिडे यांची हाक किंवा पावसाच्या सरीने […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: chhatrapati shivaji maharaj, fort, konkan forts, maratha forts, pachad, raigad in monsoon, raigad in rains, shivaji, Shivaji maharaj konkan, shivarai

2

नाटेचा यशवंतगड

July 1, 2020 by chinmayebhave

जैतापूर खाडी पूल ओलांडून नाटे गावातून मुसाकाजी बंदराकडे जात असताना डावीकडे रस्त्याजवळच एका दुर्गाची तटबंदी दिसते. हाच नाटे गावचा यशवंतगड. हे गाव राजापूर बंदराकडे जाणाऱ्या अर्जुना नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि हा किल्ला शिवकालात राजापूर बंदरात होणाऱ्या व्यापारी आणि लष्करी नौकानयनावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. किल्ल्याचे नाव सांगताना नाटे गावचा यशवंतगड असं सांगितलं जातं कारण याच नावाचा किल्ला वेंगुर्ल्याच्या दक्षिणेला रेडी गावाजवळही आहे. हा किल्ला गर्द वनराईने वेढलेला आहे. दोन मी दोनदा या ठिकाणी गेलो परंतु प्रचंड झाडोरा माजलेला […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: chhatrapati shivaji maharaj, general outram, jaitapur, jaitapur creek, kanhoji, konkan, konkan forts, Konkan monuments, Maharashtra tourism, maratha navy, musakazi, nate, patki, rajapur, Rajapur port, redi yashwantgad, sambhaji maharaj, vijaydurg, yashwantgad

Leave a comment

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • दर्शन सोमेश्वराचं
  • हर्णे बंदरातील कनकदुर्ग
  • सावंतवाडीचा राजवाडा
  • नाटेचा यशवंतगड
  • कहाणी कुणकेश्वराची
  • राममंदिर केळशीचे
  • आंबव चा सूर्यनारायण
  • करमरकर शिल्प संग्रहालय
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...