• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

लोकमान्य स्मारक

April 17, 2020 by chinmayebhave

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी शहरातील या छोट्याशा घरातला. त्यांचे वडील गंगाधरराव इथं भाडेकरू म्हणून राहत होते. टिळकांचा जन्म इथं 23 जुलै 1856 रोजी झाला. टिळकांच्या निधनानंतर रत्नागिरीतील लोकांनी हे घर त्यांचे स्मारक व्हावे म्हणून विकत घेतले. पुढे टिळकांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला हे स्मारक सरकारने तीस हजार रुपये खर्च करून विकत घेतलं आणि आता ते महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालये विभागाकडे आहे. टिळकांच्या आयुष्यातील विविध स्मृती इथं जपल्या गेल्या आहेत. टिळकांचे मूळ गाव चिखलगाव आहे दापोली […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी, संग्रहालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, kokan, Konkan beaches, Konkan tourism, lokamanya tilak, maharashtra, mtdc, tilak, tilak birth place, tilak memorial

Leave a comment

आसूदचा व्याघ्रेश्वर

April 17, 2020 by chinmayebhave

कोकणातील महादेवाची मंदिरे म्हणजे निसर्गसौंदर्य, शांतता आणि अद्भुततेचा मिलाफ. प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही आगळं वैशिष्ट्य आहे. या जागृत शिवस्थानांपैकी एक म्हणजे आसूद गावातील श्री व्याघ्रेश्वर. दापोली हर्णे रस्त्यापासून काही अंतरावर ओढ्याकाठी हे स्थान आहे. अनेक मंदिरांप्रमाणे इथेही जीर्णोद्धार होऊन काही नवीन बांधकाम झाले आहे. परंतु सुदैवाने मंदिराचे मूळ कौलारू स्वरूप अजूनही पाहता येते. हे कौलारू देऊळ सुद्धा मूळ मंदिराच्या वर बांधले गेलेले संरक्षक बांधकाम असावे असेच वाटते. हे मंदिर ७००-८०० वर्षे जुने आहे असे स्थानिकांनी सांगितले. कोकणातील बरीचशी मंदिरे […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये

5

फिरस्ती पूर्णगडाची

April 16, 2020 by chinmayebhave

रत्नागिरी शहरातून दक्षिणेला सागरी महामार्गाने निघायचे. हा प्रवासच मोठा रम्य आहे. पावस, कशेळी, आंबोळगड अशी कितीतरी सुंदर ठिकाणं या मार्गावर पाहता येतात. मराठ्यांच्या इतिहासात कोकण किनारपट्टीचे स्थान फार महत्त्वाचे. सर्व खाड्यांच्या मुखाशी दुर्ग बांधून जलवाहतूक आणि व्यापारावर पहारा ठेवणे हे महत्त्वाचे. मुचकुंदी नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं उत्तरेकडील टोकाला एका ५० मीटर उंच टेकडीवर एक छोटेखानी पण रेखीव दुर्ग आहे. तो म्हणजे किल्ले पूर्णगड. या मुचकुंदी नदीतून साटवली पर्यंत बोटी वाहतूक करत असत. डॉम जोआओ कॅस्ट्रोने या नदीला बीटल […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, darya firasti, gaonkhadi, kanhoji, konkan, maratha, maratha forts, maratha navy, muchkundi, purnagad, shivaji, siddheshwar

Leave a comment

गर्द वनराईतील केशवराज

April 16, 2020 by chinmayebhave

काही अनुभव इतके अभूतपूर्व असतात की त्यातून आयुष्यभर पुरेल अशा आठवणींचे संचित निर्माण होत असते. दापोलीजवळ आसूद इथं डोंगरावर असलेल्या केशवराज मंदिराला मी प्रथम गेलो १५-१६ वर्षांचा असताना. नारळ सुपारीच्या बागांतून सूर्यकिरणांचे कवडसे अंगावर घेत डोंगर उतरून जाणे आणि मग साकव पूल ओलांडून पुन्हा टेकडी चढणे. त्या नीरव निसर्गविश्वात खळाळणारे पाणी असो किंवा पक्ष्यांची किलबिल असो. एक एक आवाज स्पष्ट आणि मनाला भिडणारा. अचानक समोर पायवाटेवर कसलीतरी सळसळ जाणवावी आणि चपळाईने पळत गेलेलं मुंगूस दिसावं सभोवताली पाहावं तर हिरव्या रंगाच्या […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: asud, dapoli, keshav, keshavraj, konkan, konkan temples, Konkan tourism, vartak

5

शिवलंका सिंधुदुर्ग

April 15, 2020 by chinmayebhave

आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे. माणसे नवी आहेती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करून घेणे. पाया भला रुंद घेणे. खाली अवघा कातळ तरी वर थोर इमारत. तस्माद दो बाजूंस दो हात जागा सोडून तट उभारला इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाच जलदुर्गांपैकी सगळ्यात विशाल आणि मजबूत किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. एक कोटी होन खर्च करून महाराजांनी हा किल्ला […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, chhatrapati shivaji, darya firasti, konkan, malvan, padmagad, sarjekot, shivaji, shivaji maharaj

1

शिवदुर्ग खांदेरी

April 14, 2020 by chinmayebhave

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या चरित्रातील अनेक प्रेरणादायी घटना मराठी मातीत जन्मलेल्या शिवभक्तांना मुखोद्गत असतात. मग रांझे गावच्या पाटलाला केलेलं शासन असो, सूरतची लूट असो, अफझलखान वध असो किंवा शाहिस्तेखानावर मारलेला छापा असो… त्यांच्या लाडक्या सहकाऱ्यांचे पराक्रमही काही कमी नाहीत. सुभेदार तानाजी मालुसरेंनी सिंहगडावर केलेला पराक्रम, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान, मुरारबाजींनी दिलेरखानासमोर दाखवलेले अलौकिक शौर्य अशा अनेक घटना ज्या ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. पण शिवरायांच्या चरित्राच्या शेवटच्या काळात घडलेली एक महत्त्वाची घटना थोडी दुर्लक्षित राहिली आहे. […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: जिल्हा मुंबई, east india company, incredible india, kanhoji, kanhoji angre, khanderi, khanderi permission, Khanduri light house, maharashtra, maratha, maratha forts, maratha navy, maratha shivaji, maratha vs english, mtdc, naval battles, navy, shivaji maharaj

5

अंजनवेलचा टाळकेश्वर

April 13, 2020 by chinmayebhave

वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. व्याडेश्वराचे मूळ शिवलिंग तीन भागांमध्ये भंग होऊन एक भाग असगोळी येथे आला आणि तो बाळकेश्वर किंवा वालुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला तर एक भाग अंजनवेल येथे गेला तो टाळकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. काही जण या देवस्थानाचे नाव उद्धालकेश्वर […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: anjanvel, asgoli, जिल्हा रत्नागिरी, dolphin point, enron, gopalgad, guhagar, kanhoji angre, kokan, konkan, Konkan shiv, shiva temples, shivaji, shivaji maharaj, uddalkeshwar, valukeshwar

Leave a comment

रांगडा सुवर्णदुर्ग

April 8, 2020 by chinmayebhave

छत्रपती शिवराय आणि कोकण किनाऱ्याचे नाते अगदी अतूट. मावळखोऱ्यातील रांगड्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भक्ती केली, तर कोकणातील साध्याभोळ्या लोकांनी त्यांच्यावर विलक्षण प्रेम केले. कोकणचे भौगोलिक, व्यापारी, सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, सिद्दी अशा परकीय सत्ता इथं स्थानिकांवर शिरजोर झाल्या आहेत हे त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रबळ आरमारी शक्ती उभी करणे ही त्यांची प्राथमिकता होती. जसं त्यांनी कल्याण-भिवंडी जवळ खाडीत आरमार बांधून घेतलं, तसंच त्यांनी पाच जलदुर्ग बांधून घेतले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा आणि […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: bhosle, chhatrapati shivaji maharaj, commodore james, dapoli, east india company, jalaurga, janjira, kanhoji, kokan, konkan, konkan forts, maharaj, manaji angre, padmadurg, sambhaji angre, severndroog, shivaji, shivrai, siddi, sindhudurg, suvarnadurg, tulaji angre, vijaydurg

3

सडवे गावची विष्णुमूर्ती

April 7, 2020 by chinmayebhave

काही ठिकाणे अगदी जवळच असतात पण तरीही दुर्लक्षित .. नजरेआड गेलेली असतात.. मग हळूहळू त्यांना दुर्गमता प्राप्त होते आणि परिसरात राहणारे लोकही त्याबद्दल अनभिज्ञ होतात. पण अशीच आडवाटेवरील ठिकाणे हाडाच्या भटक्यांना खुणावत असतात. दापोली शहरापासून जेमतेम १५-१६ किलोमीटर अंतरावर असलेलं सडवे विष्णू मंदिर असंच एक ठिकाण. बहुसंख्य दापोली करांना या ठिकाणाबद्दल कल्पना नाही. दापोलीतून सडवली च्या दिशेने गेले की सडवे गाव लागते. काही घरे आणि एखादी शाळा आपल्याला दिसते. तिथून उतार असलेल्या कच्च्या रस्त्याने ओढ्याजवळ गेले की कोकणच्या इतिहासातील एक […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: 12th century, शिल्पकला, dapoli, dashavtar, garuda, inscription, keshav, konkan, konkan temples, Konkan vishnu, lakshmi, sadwe, shilahar, vishnu

2

टाळसुरेचा केशव

April 7, 2020 by chinmayebhave

दापोली शहरापासून जवळच मोकल बाग नावाचे ठिकाण आहे. तिथं टाळसुरे गावातील मानाई देवीचे मंदिर कुठं आहे याची चौकशी करायची. सडवे आणि शेडवई सारखीच अप्रतिम विष्णुमूर्ती इथं पाहता येते. या ठिकाणी दुर्गादेवी, मानाई आणि आणि महादेव अशी तीन मंदिरे असून मानाई देवीच्या देवळात अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसतात. काळभैरव आणि इतर ग्रामदेवता इथं आहेत. इथलं मूर्ती वैविध्य पाहिलं की वाटतं एखाद्या पुरातत्व संशोधकाने इथं यावं आणि या शिल्पांची माहिती सविस्तरपणे टिपून घ्यावी. मंदिर परिसरातील अजून एक महत्त्वाचा पुरातत्व वारसा म्हणजे इथं असलेले […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी, शिल्पकला • Tags: dapoli, Dapoli camp, keshav, konkan, konkan history, konkan temples, Konkan vishnu, Lakshmi keshav, sadwe, sapteshwar, sculptures, shedwai, vishnu

1

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • दर्शन सोमेश्वराचं
  • हर्णे बंदरातील कनकदुर्ग
  • नाटेचा यशवंतगड
  • कहाणी कुणकेश्वराची
  • राममंदिर केळशीचे
  • सावंतवाडीचा राजवाडा
  • करमरकर शिल्प संग्रहालय
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे
  • खोकरी घुमट

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

English World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...