• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

जबरदस्त जयगड

March 20, 2020 by chinmayebhave

एक क्षण कल्पना करा … कोकणात मराठेशाहीतील एका बुलंद किल्ल्याच्या कोटावर तुम्ही उभे आहात… जरीपटका झेंडा फडकतो आहे.. आणि तुमचं मन छत्रपती शिवाजी महाराजांच्या, कान्होजी आंग्र्यांच्या काळात जातं.. एका बाजूला तुम्हाला धीरगंभीर नदीचं पात्र दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला क्षितिजावर आकाशात विलीन होणार अथांग सागर दिसतोय… मासेमारी करणाऱ्या होड्या पश्चिमेकडे निघाल्या आहेत… आकाशात ढगांचे पुंजके कापसाप्रमाणे पसरले आहेत.. आकाश निरभ्र आणि त्याची निळाई गडद होत जाते आहे.. तुमच्या मनाच्या आसमंतात तुतारी आणि रणशिंग वाजते आहे.. नगारखान्यावरून युद्धघोष केला जातोय.. आणि […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, ganpatipule, jaigad, jaigad jetty, jaigad tavsal, jindal, jsw, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, maratha navy

3

साद रोहिले किनाऱ्याची

March 19, 2020 by chinmayebhave

अगदी अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी एखादा कायमचा लक्षात राहील असा अनुभव मिळणं ही भ्रमंतीची मजा आहे. असंच एक अनपेक्षितपणे मला गवसलेलं कोकणातील रम्य ठिकाण म्हणजे रोहिले. जयगडहून गुहागरकडे जाताना तवसाळला फेरीने शास्त्री नदी ओलांडली की सागरी महामार्गाने वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, असगोळी असे टप्पे पार करत आपण जातो. तवसाळच्या किनाऱ्यानंतर एक छोटीशी नदी येते ती ओलांडली की तांबूस वाळू असलेला छोटासा रोहिले किनारा लागतो. इथं नोव्हेंबरधील एका निवांत सकाळी मी अर्धा तास जो निसर्गानुभव घेतला तो अगदी अविस्मरणीय आहे. तवसाळ गावचा चढ […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, darya, darya firasti, firasti, jaigad, kokan, konkan, Konkan beaches, Konkan best beaches, Konkan unseen beaches, nature, seascapes, tavsal, vijaygad

3

तवसाळचा विजयगड

March 18, 2020 by chinmayebhave

शास्त्री नदीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला तर बहुसंख्य कोकणप्रेमींना माहिती आहेच. पण याचा जोड किल्ला सुद्धा आहे. तवसाळ येथे असलेला विजयगड. शास्त्री नदीच्या मुखाच्या उत्तरेला तवसाळ किनाऱ्यावर खडा पहारा देणारा हा दुर्ग. आज मात्र आपण या किल्ल्याचे अवशेषच पाहू शकतो. हे अवशेष सागरी महामार्गावरच आहेत पण पटकन दिसत नाहीत. जयगड ते तवसाळ फेरी पकडून आपण गुहागरच्या दिशेने सहज जाऊ शकतो. तवसाळ जेट्टीहून निघाले की डाव्या बाजूला तवसाळचा समुद्र किनारा आहे. हा टप्पा पार झाला की चढण येते आणि ही […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: bamanghal, darya, daryafirasti, firasti, guhagar, hedvi, jaigad, jaygad, konkan, narwan, rohille, tavsal, vijaygad

1

तेरेखोलचा स्वातंत्र्य दुर्ग

March 17, 2020 by chinmayebhave

दर्या फिरस्तीच्या महाराष्ट्र टप्प्याचा प्रवास जिथं संपतो किंवा जिथून सुरु होतो ते एक निसर्गरम्य, शांत असं ठिकाण आहे. भौगोलीकदृष्टीने म्हणाल तर महाराष्ट्रात पण राजकीय दृष्टीने गोव्यात. तेरेखोल नदीच्या मुखाशी एका डोंगरावर बांधलेला किल्ला .. त्याचं नावही फोर्ट तिराकोल किंवा तेरेखोल किल्ला. आता आरोंदा गावाजवळ किरणपाणी येथे पूल झाल्याने गोव्यातून इथं येणं खूप सोपं झालं आहे. तेरेखोल नदीला बांदा नदी म्हणूनही ओळखलं जातं. सुमारे २८ किमी लांब असलेल्या या नदीचं महत्त्व एकेकाळी दळणवळणासाठी विशेष मानलं जात असे. काही अभ्यासकांच्या मते तीर […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग • Tags: goa fort, goa tourism, heritage hotel goa, keri, konkan, liberation of goa, portugal, portuguese, querim, st anthony church, terekhol, tiracol, viceroy

Leave a comment

कथा बुलंद बाणकोटाची

March 16, 2020 by chinmayebhave

कधी कधी आपण एखाद्या पुस्तकात काही ठिकाणांबद्दल वाचतो, आणि मग असं वाटत राहतं की आपण तिथं कधी जाऊ शकू? ती जागा पाहण्याचा अनुभव कसा असेल? जसं वर्णन आपण वाचलं आहे तशीच ती जागा असेल का? आणि ही उत्सुकता आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या जागेला अनुभवत नाही तोवर वाढत राहते. २००६-०७ च्या सुमारास मी मोटरसायकल वरून श्रीवर्धन-हरिहरेश्वर भ्रमंती करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी प्र के घाणेकरांच्या पुस्तकात मी प्रथम बाणकोट किल्ल्याबद्दल वाचले होते. त्याआधी मुरुडचा जंजिरा, अलिबागचा कुलाबा किल्ला असे किनारी किल्ले […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा मुंबई, bankot, commodore james, dapoli, daryafirasti, east india company, English, harihareshwar, kanhoji angre, kelshi, konkan, mandangad, mandangora, mandargiri, mangaon, peshwa, shrivardhan, velas

1

कासवांचे गाव वेळास

March 14, 2020 by chinmayebhave

सकाळी सहाची वेळ. होळीचे मार्चमधील दिवस म्हणजे हिवाळा जाऊन उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ. पण कोकण किनाऱ्यावरील या निवांत गावामध्ये अजूनही थंडावा आसमंतात दरवळतच होता. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला वेळास गाव आहे. सावित्री नदीच्या मुखाशी बाणकोट किल्ल्याजवळ हे गाव आहे. दोन रस्ते आणि दुतर्फा घरे एवढाच या आटोपशीर गावाचा पसारा. गावातील घरे ओलांडून मी बांधावर आलो. रस्ता पुढे टेकडीवरून भारजा नदीच्या मुखाशी जातो त्याला डावीकडे सोडून छोट्या पुलाजवळ खाली उतरून बांधावरून चालत समुद्र किनाऱ्याकडे जायचं. सकाळची वेळ असली तरीही अनेक गाड्या पार्क […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: anjarle turtle, bankot, bhau katdare, kokan, konkan, mohan upadhye, olive ridely, sahyadri nisarga mitra, turtle, turtle conservation, turtle festival, velas

1

भ्रमंती विजयदुर्गाची

March 11, 2020 by chinmayebhave

मराठ्यांच्या स्वराज्याचे चिलखत म्हणजे दुर्ग … मग ते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर तैनात डोंगरी किल्ले असोत किंवा अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग … आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व फार मोठे. वाघोटण नदीच्या मुखाशी गिर्ये गावाजवळ हा किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे… शिलाहार राजांच्या काळात १२ व्या शतकाच्या अखेरीस या दुर्गाची बांधणी झाली असे इतिहासकार मानतात… डोम जो कॅस्ट्रो आणि तावर्निए सारख्या प्रवाशांनी आदिलशाहीचा भक्कम किल्ला म्हणून याला वाखाणले. टॉलेमी आणि पेरिप्लस ने विजयदुर्गाचा उल्लेख बायझंटियम असा केला आहे विजयदुर्गाची चित्रकथा व्हिडीओ रूपात पाहायची असेल तर या लिंकला जरूर भेट द्या. तीन बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला. छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्ग … आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला … मारुतीच्या मंदिराकडून किल्ल्यात प्रवेश करायचा … जीबीच्या दरवाजातून या दुर्गशिल्पात दाखल व्हायचे. तटबंदीवर युद्धात झेललेल्या जखमांचे व्रण आजही दिसतात … मूळ किल्ला ५ एकरांचा होता … शिवरायांनी त्याचा विस्तार १७ एकर क्षेत्रफळात केला गोमुख दरवाजा पटकन दृष्टीस पडत नाही, आणि संरक्षक […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, bakale, Gibraltar, gibraltar of the east, girye, helium, kanhoji, maratha, maratha navy, norman, vijayadurga, vijaydurg

2

अलिबागचा सर्जेकोट

March 6, 2020 by chinmayebhave

अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा हा उपदुर्ग. मुख्य किल्ल्याला संरक्षण देणारा. दगडांच्या चिऱ्यांच्या राशी रचून पाच बुरुजांचे हे बांधकाम केले गेले आहे. आज्ञापत्रात सांगितल्याप्रमाणे कुलाब्याजवळचा खडकाळ भाग तटबंदी उभारून सुरक्षित केला गेला आहे. जेणेकरून या जागेचा वापर करून किल्ल्यावर हल्ला करता येऊ नये. दगडांच्या पुलाने किंवा आजच्या भाषेत कॉजवे बांधून सर्जेकोट आणि कुलाब्याला जोडले गेले आहे. हे बांधकाम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झाले आहे असे इतिहासकार मानतात. हा किल्ला छोटासाच आहे. सुमारे २७ मीटर x २७ मीटर च्या चौरस भागात हे बांधकाम […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड • Tags: alibag, alibaug, kanhoji angre, kulaba, sambhaji, sarjekot, shivaji

1

समरभूमी कुलाबा

March 6, 2020 by chinmayebhave

अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची जानेवारीतील एक सकाळ. एरवी पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलेल्या या चौपाटीवर नीरव शांतता अनुभवणे म्हणजे विलक्षणच. निरभ्र आणि थंड सकाळी क्षितिजावर दिसणारा कुलाबा किल्ला. ओहोटीनंतर किनाऱ्यावर उरलेली पाण्याची नक्षी. नांगरून ठेवलेल्या होड्या आणि वाऱ्याने फडफडणारे त्या होड्यांवरचे झेंडे. किनाऱ्यावर सुरु झालेली सकाळची लगबग. सागरगडाच्या दिशेने दिसणारे ढगांचे पुंजके आणि धुक्याची चादर. दूर कुठेतरी मंदिरात लागलेल्या भजनाची कानावर पडणारी अस्पष्ट चाहूल. रात्रभर मासेमारी करून परतणाऱ्या होडीच्या डिझेल इंजिनचा ताल आणि थंड वाळूतून चालताना नितळ पाण्याचा पायाला होणार स्पर्श. या किल्ल्यावर मी […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: alibag, alibaug, angre, ganesh, kanhoji, kanhoji angre, khanderi, kolaba, kulaba, kulaba canons, kulaba drone, kulaba fort, sarjekot, underi, yashwant darwaja

2

कोकणातील जलदुर्ग

February 25, 2020 by chinmayebhave

छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सर्व जलदुर्गांची चित्र भ्रमंती करण्याचा आज प्रयत्न करत आहोत.  १) खांदेरीचा पराक्रम  मुंबईपासून दक्षिणेकडे काही मैल समुद्रात एका बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आहे. पावसाळ्याने रौद्र रूप धारण केल्यानंतर अगदी आजही या भागात बोटीने प्रवास […]

Categories: कोकणातील दुर्ग, मराठी, संकीर्ण • Tags: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, समुद्रकिनारे, bankot, daryafirasti, incredible india, jaigad, janjira, khanderi, kokan, kolaba, konkan, kulaba, maharashtra, maratha, padmadurg, padmagad, sarjekot, sea forts, shivaji, sindhudurg, terekhol, tiracol, underi, vijaydurg

3

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • दर्शन सोमेश्वराचं
  • हर्णे बंदरातील कनकदुर्ग
  • नाटेचा यशवंतगड
  • कहाणी कुणकेश्वराची
  • राममंदिर केळशीचे
  • सावंतवाडीचा राजवाडा
  • खोकरी घुमट
  • करमरकर शिल्प संग्रहालय
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

English World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...